हिरण्यकेशी घाटाच्या सुशोभिकरणासाठी गडहिंग्लज पालिकेला ७५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:07+5:302021-05-07T04:27:07+5:30
हिरण्यकेशी नदी घाटाच्या सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी ...
हिरण्यकेशी नदी घाटाच्या सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गडहिंग्लज शहराच्या नदीघाटावर पुरेशा सोयी-सुविधा करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिली. सुशोभिकरणाच्या निधीतून घाटाच्या परिसरात विद्युत दिवे, महिला व पुरुषांसाठी चेंजिंग रूम, दशक्रिया विधी खोली, जनावरांकरिता पाथवे, संरक्षक भिंत आदी कामे करण्यात येणार आहेत.
याकामी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, उपनगराध्यक्ष महेश कोरी, आघाडीचे पक्षप्रतोद बसवराज खणगावे, बांधकाम सभापती राजेश बोरगावे, माजी बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व नगरसेवकांचे सहकार्य मिळाले, असेही कोरी यांनी सांगितले.