इचलकरंजीत ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:12+5:302021-08-17T04:29:12+5:30

इचलकरंजी : शहर व परिसरात ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कोरोना नियमांचे पालन करून विविध ठिकाणी ...

75th Independence Day celebrations in Ichalkaranji | इचलकरंजीत ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

इचलकरंजीत ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

googlenewsNext

इचलकरंजी : शहर व परिसरात ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कोरोना नियमांचे पालन करून विविध ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून मानवंदना दिली. शहरातील विविध पक्ष कार्यालये, शासकीय कार्यालये, आजीएम, तिन्ही पोलीस ठाणे, मंडळे, सामाजिक संस्थानी तिरंग्यास सलामी देऊन मानवंदना दिली.

इचलकरंजी नगरपालिकेच्यावतीने पालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर, अजित जाधव, सागर चाळके यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहर काँग्रेस समितीच्यावतीने काँग्रेस भवनच्या प्रांगणात समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर, विठ्ठल डाके, रहेमान खलीफा, तुकाराम पाटीलल, मीना बेडगे उपस्थित होते. ताराराणी पक्ष कार्यालयात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, स्वप्निल आवाडे, विलास गाताडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, शेखर शहा उपस्थित होते.

महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे कार्यालय परिसरात पुंडलिक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. आनंदीबाई कर्वे मराठी विद्या मंदिरातील मुलांना खाऊ वाटप केले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र निकम, सद्दाम मुजावर, केप्पाना हालगेकर, सचिन बिरांजे, इम्तियाज शेख, बाबू हालगेकर होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने लक्ष्मी मार्केट येथे पक्षाच्या कार्यालयासमोर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीमती लक्ष्मीबाई बाबू देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. सचिव दत्ता माने यांनी प्रास्ताविक केले. उदय नारकर यांनी भारतीय स्वातंत्र्याची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी ए. बी. पाटील, शिवगोंडा खोत, आनंदराव चव्हाण, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सैफनबी शेख, बेबी हाटकर, शोभा झळके व कार्यकर्ते उपस्थित होते.

विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडीमध्ये रामकिशोर वर्मा व पुरुषोत्तम चीतलांगिया यांनी ध्वजारोहण केले. सपना मेळवंकी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विकास चौगुले, द्वारकाधीश चांडक, अमृत छाजेड, महावीर सिंघवी, अमित पाटील, चेतन दायमा, दत्ता देसाई, आदी उपस्थित होते. समाजवादी प्रबोधिनीत प्रा. रमेश लवटे यांनी ध्वजारोहण केले.

फोटो ओळी

१६०८२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजी नगरपालिकेच्यावतीने पालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, दीपक सुर्वे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, अजित जाधव, सागर चाळके, आदी उपस्थित होते.

Web Title: 75th Independence Day celebrations in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.