शहरात ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:16+5:302021-08-17T04:28:16+5:30
गोपाळ कृष्ण गोखले काॅलेज कोल्हापूर : येथील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात रविवारी ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...
गोपाळ कृष्ण गोखले काॅलेज
कोल्हापूर : येथील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात रविवारी ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई यांच्या उपस्थितीत व प्राचार्य डाॅ. पी. के. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य एस. एच. पिसाळ, एस. एन. मोरे, प्रबंधक व्ही. एस. जौंदाळ, प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. डाॅ. ए. एन. बसुगडे, प्रा. बी. जे. पाटील, प्रा. डी. के. नरळे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्था
कोल्हापूर : येथील जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थेच्या योगेश्वरी काॅलनीतील कार्यालयात ७५ वा स्वातंत्र्यदिन मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उत्तम गोसावी, मुरलीधर गोसावी, शिवाजी गोसावी, संतोष गोसावी, अनिल गिरी, राजू पुरी, बाळू बुवा, अविनाश भारती, मिनल गोसावी, विद्या गोसावी आदी उपस्थित होते.
डाॅ. श्रीधर सावंत विद्यामंदिर
कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील श्रीधर सावंत विद्यामंदिरात स्वातंत्र्यदिनानिमित्त डाॅ. हर्षवर्धन जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, मुख्याध्यापक एस. एम. पाटील, मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, माजी मुख्याध्यापक अमर भोसले, आर. डी. पाटील, आर. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त अध्यक्ष बी. जी. बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्था चेअरमन के. जी. पाटील यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष शुभारंभ झाला. यावेळी व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, प्रा. सी. एम. गायकवाड, उदय पाटील, सचिव रणजित शिंदे, मुख्याध्यापक ए. एस. रामाणे, प्रा. मनीषा नायकवडी, उपप्राचार्य यु. आर. आतकीरे, एस. एस .मोरे आदी उपस्थित होते.
दत्ताबाळ हायस्कूल
कोल्हापूर : कसबा बावड्यातील श्री दत्ताबाळ हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी सैनिक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्था अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, रोहिणी शेवाळे, कीर्ती मिठारी, बालाजी मुंडे आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल
कोल्हापूर : सोमवार पेठेतील देशभूषण विद्यामंदिर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा समिती सदस्य एम. बी. अंकले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी समिती अध्यक्ष डी. एस. लडगे, मुख्याध्यापक आर. ए. गाट, व्ही. ए. पाटील, ए. एस. वागरे, एस. आर. भेंडे आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
शीलादेवी डी.शिंदे सरकार हायस्कूल
कोल्हापूर : तपोवन येथील शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य अजयसिंह चिले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका अनघा कशाळकर, अर्चना जाधव, ए. ए. नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश विद्यामंदिर
कोल्हापूर : सदरबाजारातील प्रकाश विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या सचिव रुपा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्था अध्यक्षा कमल पांढरबळे , मुख्याध्यापिका कुसुम पांढरबळे, प्रा. राजेंद्र पोंदे, डाॅ. अतुल पांढरबळे, तानाजी चौगुले, बाबूराव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.