दुसऱ्या लाटेत जि.प.चे ७६ कर्मचारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:59+5:302021-05-30T04:19:59+5:30
गतवर्षी कोरोना संसर्गानंतर शासनाच्या सूचनांप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बंधने आणण्यात आली होती, तरीही २०८ जण बाधित ...
गतवर्षी कोरोना संसर्गानंतर शासनाच्या सूचनांप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बंधने आणण्यात आली होती, तरीही २०८ जण बाधित झाले होते. तर पाचहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला होता. बाधित होणाऱ्यांमध्ये आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती.
यंदा १ जानेवारीपासून ७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या १४ जणांना बाधा झाली असून यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही लागण झाली असून, यामध्ये सर्वांमध्ये करवीर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
अन्य बाधितांमध्ये सामान्य प्रशासन, जलजीवन मिशन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही मुख्यालयातील तर काही पंचायत समिती स्तरावरील आहेत.