कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 04:23 PM2023-07-19T16:23:35+5:302023-07-19T16:23:52+5:30

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचे

76 villages in Kolhapur district will be advised to evacuate due to the risk of landslides | कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

googlenewsNext

कोल्हापूर : दरड कोसळणे, भुस्खलन, जमीन खचणे, रस्ता खचणे, अशा वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यातील ७६ गावे भीतीच्या छायेखाली आहेत. या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली असून यातील काही गावे ही लोकवस्तीची असून मुसळधार पाऊस सुरू झाला की तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात.

पावसाळा सुरू झाला की पुराच्या धोक्यामुुळे कोल्हापूर जिल्हा नेहमीच हायअलर्टवर असतो. याकाळात अतिवृष्टी होत असलेल्या ठिकाणी दरडी कोसळणे, भुस्खलन होणे, जमीन खचणे किंवा रस्ता खचणे असे प्रकार होतात. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात याचे प्रमाण जास्त आहे.

सन २०२१ दरड कोसळून राधानगरीतील दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. तसेच करवीरमधील शिपेकरवाडी येथेही अशी घटना घडली होती. अतिवृष्टी सुरू झाली की जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून या लोकांचे स्थलांतर केले जाते. यात जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या वतीने जनजागृती केली आहे.

जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे / गावे

शाहुवाडी : घोलसवडे, पणुरे, कासार्डे. कांडवणपैकी आगलावेवाडी, माणपैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसर्ले, लोलाणे, करंजफेण, मारळे, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शित्तूर वरुण, कडवेपैकी शिंदेवाडी, उखळू, पणुद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, उखळूपैकी अंबाईवाडीपैकी खोतवाडी, शिराळा मलकापूर धनगरवाडा.
पन्हाळा : बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेटते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळूंगे ॲडव्हेंचर पार्क, आपटी.
करवीर : महे, बोलोली, शिपेकरवाड एरिया, आमशी सातेरी, खुपिरे.
भुदरगड : मौेजे डेलेपैकी भारमलवाडी, फये, भेंडेवेडी, बीजवडे, पडखांबेपैकी खोतवाडी, पडखांबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कालवडेपैकी हारफोडेवाडी, टिक्केवाडी, मंदापूर
गडहिंग्लज : चिंचेवाडी, सामानगड.
राधानगरी : कोणाली तर्फ असंडोली, पाटपन्हाळादरड, गैैबीघाट, शिरगाव, सावतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोटेवाडी, केळोशी बुद्रूक, केळोशी खुर्द, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, माणबेट, चौके, राऊतवाडी, पणोरी, कासारपुतळे, पाल बुद्रूक पैकी मोहितेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धमालेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पांडेवाडी, सोळांकूर रामनगर.
कागल : बोळावी ठाणेवाडी, बेलेवाडी मासा, चिकोत्रा खोरे हासूर बुद्रूक, रांगोळी.
आजरा : वाजरे, खोतवाडी, पेरणोली, हारपेवाडी
चंदगड : गंधारगड
गगनबावडा : अणदूर रोड, कडवे रोड, मांडुकली, शेळोशी रोड.

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचे

जिल्ह्यातील या ७६ गावांमधील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतर होणे गरजेचे आहे. याठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्याचा विचार झाला होता, पण अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही.


जिल्ह्यातील ७६ ठिकाणे धोकादायक असली तरी त्यातील मानवी वस्ती असलेली मोजकीच गावे आहे. अतिवृष्टी सुरू झाली की परिस्थिती बघून तेथील नागरिकांना जवळचे सभागृह, समाज मंदिर, शाळांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. - प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Web Title: 76 villages in Kolhapur district will be advised to evacuate due to the risk of landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.