बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:58 PM2018-05-12T23:58:11+5:302018-05-12T23:58:11+5:30

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७६.१८ टक्के मतदान झाले.

76% voting in peaceful district of Belgaum district | बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान

बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान

Next

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७६.१८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ८४ टक्के मतदान चिकोडी सदलगा मतदारसंघात,
तर सर्वांत कमी ६१.५७ टक्के

मतदान बेळगाव दक्षिण मतदारसंघात झाले. मंगळवारी (दि. १५) मतमोजणी होणार आहे. शहरातील आर. पी. डी. कॉलेजमध्ये १८ मतदारसंघांची मतमोजणी करण्यात येणार आहे.

बेळगाव उत्तर मतदारसंघात सकाळच्या सत्रात चुरशीने मतदान झाले होते. बूथ क्रमांक १८५ मध्ये महिला पोलिसांना बुरखा काढून चेहरा दाखविण्यास एका महिलेने विरोध केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. हनुमान नगर भागात घरातील सदस्य संख्येपेक्षा अधिक मतदार असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी करून मतदान केंद्राबाहेर निदर्शन केली.

महिला मतदारांची मतदान संख्या वाढावी या उद्देशाने दोन बूथ गुलाबी रंगाचे उभारण्यात आले होते. या दोन्ही बूथमध्ये सर्व महिला मतदान कर्मचारी होते. उत्तर मतदारसंघात एका व्यक्तीकडून मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. जिल्हा प्रशासन संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहे.

निपाणीत उत्साहात ८० टक्के मतदान
निपाणी : निपाणी मतदारसंघात अपवाद वगळता शांततेत ८०.७८ टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदारांना अमिष दाखवून काही ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार घडल्याने काहींना बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी
निपाणी ८०.७८, चिकोडी-सदलगा ८४.६५ अथणी ८०, कागवाड ७९.९८, कुडची ७५.८६, रायबाग ७७.४८, हुक्केरी ७८.४२, अरभावी ७६.२९, गोकाक ७१.७९, यमकनमर्डी ७९.८९, बेळगाव उत्तर ६३.१८, बेळगाव दक्षिण ६१.५७, बेळगाव ग्रामिण ७७.५२, खानापूर ७१.८०, कित्तूर ७८.४२, बैलहोंगल ७७.९२, सौंदत्ती ८०.०५, रामदुर्ग ७५.३०.

हुक्केरी मतदारसंघात ७८ टक्के मतदान
संकेश्वर: हुक्केरी मतदारसंघात ७८.४२ टक्के मतदान झाले. येथे भाजपचे उमेश कत्ती व कॉँग्रेसचे ए.बी.पाटील यांच्यात लढत आहे. हुक्केरी शहरात भाजप-कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली.


बेळगावातील २०३ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. बेळगावात दुपारी पावसाची शक्यता असल्याने सकाळपासून शहरासह उपनगरात मतदारांच्या रांगा वाढल्या होत्या.
जिल्ह्यात एकूण १८ जागांसाठी ३७ लाख ३७ हजार मतदार आहेत. त्यापैकी महिला १८ लाख ३४ हजार, तर पुरुष १८ लाख ८८ हजार मतदार आहेत. एकूण ४४१६ मतदान केंद्रे असून, त्यातील ८३६ अति संवेदनशील आहेत. या १८ मतदारसंघांत २०३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १८४ पुरुष, तर १९ महिला उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी २४,२८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव ग्रामीणमधून एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपचे संजय पाटील, बेळगाव दक्षिण समितीचे किरण सायनाक, भाजपचे अभय पाटील, काँग्रेसचे एम. डी. लक्ष्मी नारायण, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे, तर खानापुरातून समितीचे विलास बेळगावकर, काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर, जेडीएसचे नासिर बागवान, भाजपचे विठ्ठल हलगेकर, मध्यवर्ती समितीचे अरविंद पाटील, बेळगाव उत्तरेतून काँग्रेसचे फिरोज सेठ, भाजपचे अनिल बेनके, समितीचे बाळासाहेब काकतकर रिंगणात आहेत. एकीकरण समितीत दोन-दोन उमेदवार उभे आहेत. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

Web Title: 76% voting in peaceful district of Belgaum district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.