पदोन्नती पात्र विज्ञान शिक्षकांची ७७८ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:09+5:302021-03-23T04:25:09+5:30
पदोन्नती पात्र विज्ञान शिक्षकांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. २०१४ ...
पदोन्नती पात्र विज्ञान शिक्षकांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. २०१४ पासून आम्ही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहोत. रिव्हर्शन प्रक्रिया झाल्यामुळे अनेक शाळांमध्ये सध्या विषय शिक्षक पदे रिक्त आहेत. सध्या जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू असल्याने आणि त्याच वर्गावरची शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्याचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर होऊ शकतो असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संजय रोगे, बालाजी पांढरे, सुहासिनी पाटील, मंगेश धनवडे, मारुती फाळके यांच्यासह शिक्षक यावेळी उपस्थित होते.
चौकट
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
१३ ऑक्टोबर २०१६ रोजी शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन आदेश काढला होता. गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने इतिहास, भूगोल किंवा मराठी विषय घेऊन पदवीधर झालेले शिक्षक सध्या गणित व विज्ञान हे विषय शिकवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणित व इंग्रजी या दोन्ही विषयांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे हे विषय घेऊन पदवीधर झालेल्या शिक्षकांना प्राधान्य द्यावेे, असे या शासन आदेशात नमूद केले आहे. मात्र हाच आदेश पाळण्यात आलेला नाही, असे या शिक्षकांचे म्हणणे होते.