रूकडी येथे कोरोनाचे ७८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:00+5:302021-05-05T04:38:00+5:30

रूकडी येथे ७८ रुग्ण कोरोनाने संसर्गित असून यापैकी २८ रुग्ण घरी तर ५० रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. ...

78 patients of Corona at Rukdi | रूकडी येथे कोरोनाचे ७८ रुग्ण

रूकडी येथे कोरोनाचे ७८ रुग्ण

Next

रूकडी येथे ७८ रुग्ण कोरोनाने संसर्गित असून यापैकी २८ रुग्ण घरी तर ५० रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. हातकणंगले तालुक्यात रूकडी हा कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनले असून एकूण १५५ रुग्ण कोरोनाने बाधित झाले होते, यापैकी१० रुग्ण दगावले आहेत.

रूकडीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना काल दोनच रुग्ण बाधित झाल्याचे अहवाल आला आहे. हे चित्र दिलासादायक असताना अद्याप ७८ रुग्ण बाधित आहे. येथील एका विवाहित पती-पत्नी कोरोनाने बाधित होते, यापैकी पतीचा मृत्यू झाला आहे. यामुळे रूकडी गावावर शोककळा पसरले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन २ मे पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

रूकडी गावाची लोकसंख्या पाहता येथे लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरविणे शक्य नसल्याचे हेरले आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान रूकडीसाठी अधिक लस उपलब्ध व्हावे यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतले आहेत. समुदय आरोग्याधिकारी प्रदीप बुधे, आरोग्यसेवक संदीप कुंभार,आरोग्यसेविका शबाना हवालदार, शकिला गोरवाडे सह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका हे विशेष परिश्रम घेऊन विशेष तपासणी मोहीम राबविले आहेत. त्याचबरोबर रूकडी परिसरात कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभा करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: 78 patients of Corona at Rukdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.