कोल्हापूर जिल्ह्यात ७९ हजार दुबार मतदार, गतवर्षीच्या तुलनेत 'इतके' मतदार झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:27 PM2023-01-18T16:27:37+5:302023-01-18T16:54:33+5:30

मतदारांच्या छायाचित्रात व माहितीत साम्य असल्याचे आढळले आहे.

79 thousand double voters in Kolhapur district, less than 25 thousand voters compared to last year | कोल्हापूर जिल्ह्यात ७९ हजार दुबार मतदार, गतवर्षीच्या तुलनेत 'इतके' मतदार झाले कमी

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा निवडणूक विभागाने ५ जानेवारीला जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात २५ हजार १५९ मतदार कमी झाले आहे, तर जिल्ह्यात एकूण ७९ हजार १२४५ मतदारांच्या छायाचित्रात व माहितीत साम्य असल्याचे आढळले आहे.

जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यानुसार नवमतदारांची नोंद, मयत, पत्ता बदललेल्यांची नावे वगळणे, छायाचित्रात साम्य असलेल्या मतदारांची तपासणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक विभागाने दि. ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुरुष, स्त्री व तृतीयपंथी या गटातील एकूण ३१ लाख ५० हजार ४६ मतदार जिल्ह्यात आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत २५ हजाराने कमी आहे.

७९ हजार छायाचित्रात साम्य

निवडणूक विभागाच्या सिस्टीममध्ये ७९ हजार मतदारांच्या छायाचित्रांमध्ये साम्य दाखविले जात आहे. असे साम्य असलेल्या मतदारांची त्या त्या भागातील बीडीओंमार्फत गृहभेटीद्वारे चौकशी केली जाते. एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदार नोंदणी दिसत असेल तर त्यांच्या सहमतीने दुसऱ्या मतदारसंघातील नावे कमी केली जातात.

सैनिकी, तृतीयपंथी मतदार वाढले

निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सैनिकी व तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. एकूण १३ सैनिकी मतदारांमध्ये, तर ३९ तृतीयपंथी मतदारांची वाढ झाली आहे.

४० ते ४९ वयोगटांतील सर्वाधिक मतदार

या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधीक ६ लाख ६४ हजार ४१२ मतदार आहेत. त्या पाठोपाठ ३० ते ३९ वयोगटांतील ६ लाख ३४ हजार ९९५ मतदार २० ते २९ वयोगटातील ५ लाख ६० हजार ५८९ मतदार आहेत. नवमतदारांची संख्या २५ हजार ३८२ इतकी आहे.

शंभरी पार केलेले १८०० मतदार

जिल्ह्यात वयाच्या शंभरीत असलेले तसेच शंभरी पार केलेले तब्बल १ हजार ८६७ मतदार आहेत. ही संख्या शिरोळमध्ये सर्वाधिक असून, येथे ३३५ मतदार आहेत. त्यानंतर चंदगडमध्ये २२७ मतदार या वयोगटातील आहेत.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?
विधानसभा : मतदार
चंदगड : ३ लाख १९ हजार ७५०
राधानगरी : ३ लाख ३२ हजार ७२६
कागल : ३ लाख २६ हजार २०७
कोल्हापूर दक्षिण : ३ लाख ३७ हजार ४६१
करवीर : ३ लाख १४ हजार ८७९
कोल्हापूर उत्तर : २ लाख ८८ हजार २३९
शाहूवाडी : २ लाख ९५ हजार ७८०
हातकणंगले : ३ लाख २७ हजार ७५१
इचलकरंजी : २ लाख ९४ हजार ४०
शिरोळ : ३ लाख १३ हजार २१३
एकूण : ३१ लाख ५० हजार ४६
 

Web Title: 79 thousand double voters in Kolhapur district, less than 25 thousand voters compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.