सलग ३७ व्या रविवारी स्वच्छता मोहीम, १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:00 PM2020-01-13T12:00:02+5:302020-01-13T12:01:05+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता मोहिमेचा ...
कोल्हापूर : शहरामध्ये रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता मोहिमेचा सलग ३७ वा रविवार आहे. या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंटआॅफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज विद्यार्थी, वृक्षप्रेमी संघटना, स्वरा फौंडेशन, कोल्हापूर शहर परीट समाज, मेनन कंपनीचे कर्मचारी, स्वच्छतादूत अमित देशपांडे उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली.
यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, गेल्या नऊ महिन्यांपासून सलग स्वच्छता मोहीम सुरू आहे. कोल्हापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. प्लास्टिकचा वापर करू नका व इतरांनाही करू देऊ नका.
शासनाकडून स्वच्छ भारत अभियानातून स्पर्धा सुरू असून, देशात ५ च्या आत क्रमांक येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; यासाठी सर्वांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवून ओल्या कचऱ्यापासून घरी खतनिर्मिती करावी. स्वच्छ सर्व्हेक्षणातील जे सात निकष आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरवासीयांनी सहभागी होऊन आपले अभिप्राय द्यावेत. सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, नागरिकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा.
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधिस्थळाचे रविवारी लोकार्पण होणार आहे. यावेळी या परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. नगरसेविका सुरेखा शहा, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, शाखा अभियंता आर. के. पाटील, शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सर्व आरोग्य निरीक्षक, शशिकांत भालकर, स्वरा फौंडेशनचे आदित्य लातूरकर, व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे, विनायक भाट, प्रेम सातपुते उपस्थित होते.
स्वच्छता केलेला परिसर
रंकाळा तलाव शाहू स्मृती बाग, आयसोलेशन हॉस्पिटल ते शेंडा पार्क, रिलायन्य मॉलमागील परिसर, डायना पार्क येथील ओपन स्पेस, शुक्रवार पेठ गायकवाड वाडानजीक, शिर्के उद्यान, रेल्वे गुड्स, कोटीतीर्थ तलाव, हुतात्मा पार्क या परिसराची तसेच दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ रोड, उड्डान पूल ते कावळा नाका व कावळा नाका ते तावडे हॉटेल, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा मेनरोड, पापाची तिकटी ते गंगावेश रोड
महापालिकेची यंत्रणा
४ जेसीबी, ५ डंपर, ६ आरसी गाड्या व महापालिकेचे १४0 स्वच्छता कर्मचारी.