महिला बँकेच्या सभासदांना ८ टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:05+5:302021-09-24T04:29:05+5:30

बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याज परतावा योजना सुरू केलेली आहे. बँकेकडे विविध कर्ज योजना सुरू आहेत. कोअर बँकिंग, रूपे ...

8% dividend to Mahila Bank members | महिला बँकेच्या सभासदांना ८ टक्के लाभांश

महिला बँकेच्या सभासदांना ८ टक्के लाभांश

Next

बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याज परतावा योजना सुरू केलेली आहे. बँकेकडे विविध कर्ज योजना सुरू आहेत. कोअर बँकिंग, रूपे डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग आदी सेवा सुरू आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष माधुरी शिंदे यांनी केले. नोटीस वाचन महाव्यवस्थापक जे. के. कुंभार यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी चर्चेनंतर मंजुरी दिली. सुलोचना यादव, प्राची कावले, विमल दळवी, सई ढोबळे, अल्पना शिंदे यांनी कामकाजात सहभाग घेतला. अहवाल सालात बँकेने केलेल्या प्रगतीबद्दल अध्यक्षा, उपाध्यक्षा व संचालकांचे अभिनंदन केले. संचालिका मनीषा दमामे यांनी बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. सभेस संचालिका लतादेवी जाधव, सुनीता डोंगळे, जानकीदेवी निंबाळकर, तिलोत्तमा भोसले, भारती डोंगळे, सुधा इंदुलकर, मोहिनी घोटणे, मथुराबाई सुतार, जयश्री परमाळे, विजया जाधव, संयोगीता पाटील उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात बँकेची घोडदौड

सभासद : १२ हजारांहून अधिक

वसूल भांडवल : ४ कोटी

राखीव निधी : ९ कोटी ६२ लाख,

ठेवी : ९७ कोटी ९३ लाख,

गुंतवणूक : ५१ कोटी ७१ लाख,

कर्जे : ५४ काेटी ८१ लाख,

खेळते भांडवल : ११४ कोटी ७५ लाख,

निव्वळ नफा : ६० लाख ४८ हजार,

सीआरएआर प्रमाण : १६.७८ टक्के,

निव्वळ एनपीए : १.२० टक्के

लेखापरीक्षण वर्ग : ‘अ’

फोटो : २३०९२०२१-कोल-महिला बँक

ओळी : कोल्हापूर महिला सहकारी बँकेच्या ४८ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी अध्यक्षा शैलजा सूर्यवंशी यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

Web Title: 8% dividend to Mahila Bank members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.