‘म्युकर’चे नवे ८ रुग्ण, तर एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:11+5:302021-05-29T04:20:11+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये म्युकरमायकोसिसचे नवे ८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, ...
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये म्युकरमायकोसिसचे नवे ८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, तर एकाचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘म्यकुर’मुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सहा झाली आहे.
सध्या जिल्ह्यात म्युकरच्या ६१ रुग्णांवर सीपीआर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसात सीपीआरच्या माध्यमातून म्युकरवरील खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी १५०० इंजेक्शन्स विकत देण्यात आली आहेत. शुक्रवारी १५० इंजेक्शन्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चौकट
दिवसभरात २४१६ जणांना लस
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात २४१६ नागरिकांना लस देण्यात आली. ५८ केंद्रांवर ही लस देण्यात आली. २०९७ नागरिकांना पहिला, तर ३१९ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अजून ३००० पर्यंत डोस शिल्लक असून शनिवारी किती डोस येणार, याची ठोस माहिती मिळाली नाही. तेव्हा ज्यांना फोन येईल अशाच नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.