पंचगंगेत रोज ८० एमएलडी सांडपाणी-- नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:04 AM2017-10-24T01:04:23+5:302017-10-24T01:07:15+5:30

कोल्हापूर : एकेकाळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देणाºया महानगरपालिका प्रशासनाला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता न आल्याने थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून दिले जात होते. मात्र,

 80 MLD of waste water in Panchgang- Sports with the health of citizens | पंचगंगेत रोज ८० एमएलडी सांडपाणी-- नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

पंचगंगेत रोज ८० एमएलडी सांडपाणी-- नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Next
ठळक मुद्देदूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका;: सांडपाणी वाहिनी फुटल्याचा फटका. नदीच्या खालच्या भागात येणाºया गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे सध्या तरी

भारत चव्हाण ।
कोल्हापूर : एकेकाळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देणाºया महानगरपालिका प्रशासनाला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता न आल्याने थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून दिले जात होते. मात्र, चार वर्षांपूर्वी राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून अद्ययावत असे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यानंतरही तांत्रिक कारणामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अशक्य झालेले आहे. परिणामी, दररोज ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. नदीच्या खालच्या भागात येणाºया गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे सध्या तरी काहीच होताना दिसत नाही.

अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन, गंभीर प्रश्नाकडेसुद्धा कानाडोळा करण्याची वृत्ती, अत्यावश्यक सेवेच्या कामाची निविदा काढण्यात झालेली चालढकल, अशा गोंधळजनक कामामुळे आज घडीला शहरातील सर्व प्रकारचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट पंचगंगा नदीत सोडून दिले जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन साथीचे, तसेच जलजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढलेला आहे. अधिकाºयांच्या अशाच मानसिकतेतून काम सुरू राहिले, तर पुढील दोन महिने तरी सांडपाणी रोखण्यात प्रशासनाला यश येईल, याची सुतराम शक्यता नाही.

१३ सप्टेंबरला रात्री बारा वाजता शहरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहरात सखल भागात, तसेच ओढ्यांच्या काठावर राहणाºया नागरिकांच्या शेकडो घरात पाणी शिरले. त्याच रात्री जयंती नाला पंपिंग हाऊसजवळील सांडपाणी वाहून नेणारी एक पाईपलाईन लोखंडी पुलासह नाल्यात कोसळली. जयंती नाल्यातील दिवसभरातील सुमारे ६० एमएलडी सांडपाणी दसरा चौक येथील पंपिंग हाऊसमधून उचलून ते या पाईपलाईनद्वारे कसबा बावडा येथील अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नेण्यात येत होते; पण ही पाईपलाईनच कोसळली असल्याने सांडपाणी वाहून नेण्याचे काम बंद पडले आहे. परिणामी, नाल्यातून येणारे सर्व सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय पुढे पंचगंगा नदीत मिसळत आहे.
दुधाळी नाल्यावर १८ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शिवाय बापट कॅम्प व कदमवाडी येथील नाल्यावर बंधारे बांधून त्यातील १० एमएलडी सांडपाणी कसबा बावडा प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे कामसुद्धा अपूर्ण आहे.

यंत्रणा सक्षम, हाताळणी सदोष
जयंती नाल्यातील सांडपाणी उपसा करण्याकरिता ४५० अश्वशक्तीचे चार पंप आहेत. नुकतीच या उपसा केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे; परंतु पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून ही यंत्रणाही बंद आहे. ७६ कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही अद्ययावत आहे; पण सांडपाणी मिळणे बंद झाल्यामुळे हे केंद्रही बंद ठेवावे लागले आहे. महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम असूनही हाताळणी नीट नसल्याने नदीचे प्रदूषण वाढणार आहे


मनपा प्रशासनाची क्षमता
७५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे अद्ययावत प्रक्रिया केंद्र.
केंद्रात १२.५० एम.एल.डी.चे सहा अद्ययावत बेड
प्रक्रिया केंद्रात संगणकीय स्काडा पध्दतीचा वापर
प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाºया पाण्याचा वापर शेती, बांधकाम, उद्यानासाठी
प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारा गाळ शेतकºयांना मोफत
प्रक्रिया केंद्र अद्ययावत असल्याने साथीच्या आजारांचा धोका कमी
प्रक्रिया के ंद्र सुरु राहिल्यास नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत

सध्याची परिस्थिती
जयंती नाला ६० एमएलडी सांडपाणी
दुधाळी नाला १८
ते २० एमएलडी सांडपाणी
बापट कॅॅम्प, कदमवाडी नाला १० ते १२ एमएलडी सांडपाणी
सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जात आहे
सव्वा महिना झाला
तरी सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्णपणे बंद
 

सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे. जयंती नाला येथून सांडपाणी उपसा बंद ठेवला आहे. नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी प्रमाणात व्हावे म्हणून ब्लिचिंग पावडरचा डोस वाढविण्यात आला आहे. याबाबत आम्ही प्रयत्न करीत असून, लवकरात लवकर हा प्रश्न सोडविला जाईल. - सुरेश कुलकर्णी, जल अभियंता.

Web Title:  80 MLD of waste water in Panchgang- Sports with the health of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.