जिल्ह्यासाठी ८०० कोटी निधी

By admin | Published: March 20, 2017 12:48 AM2017-03-20T00:48:56+5:302017-03-20T00:48:56+5:30

चंद्रकांतदादा पाटील : दळणवळणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

800 crore fund for the district | जिल्ह्यासाठी ८०० कोटी निधी

जिल्ह्यासाठी ८०० कोटी निधी

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सेवेच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात सुमारे ८०० कोटींची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. विशेष तरतुदीमुळे अनेक योजना मार्गी लागणार आहेत. शिवाय विमानतळ विकासासाठी राज्य शासनाने ३० टक्के रकमेचे हमीपत्र सुपूर्द केल्याने हा राज्याचा समतोल विकास साधणारा, सर्वच घटकांना स्थान देणारा अर्थसंकल्प आहे, असेही चंद्रकांतदादा यांनी म्हटले आहे.
उद्योगधंद्यांच्या अनुषंगाने तसेच कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा वाढलेला ताण व कोंडी कमी होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नव्या रिंग रोडसाठी ४५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राधानगरी तालुक्यातील सोनवडे-शिवडावसाठी १२९ कोटी, तसेच अन्य रस्त्यांसाठी २०० कोटींची तरतूद केली आहे. दळणवळण सेवेचा विस्तार करताना रस्त्यांचा दर्जा हा तितकाच महत्त्वाचा असल्याने दहा-दहा किलोमीटरचे रस्ते केले जाणार असून, या रस्त्यांच्या दोन वर्षांच्या देखभाल- दुरुस्तीची हमी दिली जाणार आहे.
कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी ३०० कोटी खर्च येणार आहे. या विमानतळाचा विकास झाल्यास येथील उद्योगधंद्यांमध्ये झपाट्याने वाढ होईल. त्यासाठी
राज्य शासन यापैकी ३० टक्के रक्कम देईल, असे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे विकासाची नवी सुरुवात झाली आहे.
पर्यटन विकासासाठी प्रयत्न सुरूच असून नृसिंहवाडी, अंबाबाई, बाहुबलीपाठोपाठ आता जोतिबाच्या विकासासाठी २५ कोटी दिले आहेत. तेही या अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)


दीर्घकालीन योजना
शेतकरी विकास हा केंद्रबिंदू मानून अर्थसंंकल्प सादर झाला आहे. शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त करून चालणार नाही. तो स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहे. पुढील काही वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठीचे नियोजन आहे.

वाड्या-वस्त्यांवर पाणी
पाण्याच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाड्या आणि वस्त्यांवर पाण्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आपले अधिक प्रयत्न असणार आहेत. पाण्याच्या योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जातील.

Web Title: 800 crore fund for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.