बिंदू चौक परिसरात एका दिवसात ८०० किलो ई-कचरा संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:23 AM2021-03-24T04:23:15+5:302021-03-24T04:23:15+5:30

पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने कोल्हापूर अर्थ वॉरियर्सकडून ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत बिंदू चौक परिसरातील खादी ग्रामोद्योगशेजारी संकलन ...

800 kg e-waste collected in one day in Bindu Chowk area | बिंदू चौक परिसरात एका दिवसात ८०० किलो ई-कचरा संकलित

बिंदू चौक परिसरात एका दिवसात ८०० किलो ई-कचरा संकलित

Next

पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने कोल्हापूर अर्थ वॉरियर्सकडून ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत बिंदू चौक परिसरातील खादी ग्रामोद्योगशेजारी संकलन केंद्र उभारून ई-कचरा संकलित करण्यात आला. या अभियानाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिराळकर आणि सूर्योदय तरूण मंडळाचे सुंदर देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विशाल शिराळकर, पूजा शिराळकर, प्रकाश पाटील, किरण माने उपस्थित होते. सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत राबविण्यात आलेल्या अभियानात सुमारे ८०० किलोचा ई-कचरा संकलित झाला. त्यात खराब संगणक, सीपीयू, मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, केबल्स, आदींचा समावेश होता. पुणे येथील महालक्ष्मी रिसायकलर्सचे व्यवस्थापक मनीष कुलकर्णी यांच्याकडे संकलित झालेला ई-कचरा सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या सुबोध भिंगार्डे, युवराज गुरव, आशिष कोंगळेकर, परितोष उरकुडे, विजय सावंत, तात्या गोवावाला, सुरेश खांडेकर, सुरेश सुतार, नितीन डोईफोडे, अभिजीत कुलकर्णी, स्वाती कदम, तृप्ती देशपांडे, आदिती गर्गे, प्रिया मोहिते, हेमलता बोरकर, वंदना पुसाळकर, प्रतिभा शिंगारे, प्रमिला बत्तासे, दीपा भिंगार्डे सहभागी झाल्या.

फोटो (२३०३२०२१-कोल-ई-कचरा संकलन) : कोल्हापुरात मंगळवारी बिंदू चौक परिसरात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्यावतीने आयोजित अभियानात विशाल शिराळकर यांच्याकडे नागरिकांनी ई-कचरा जमा केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२३०३२०२१-कोल-ई-कचरा संकलन ०१) : कोल्हापुरात मंगळवारी बिंदू चौक परिसरात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्यावतीने ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. यावेळी डावीकडून अभिजीत कुलकर्णी, परितोष उरकुडे, विशाल शिराळकर, युवराज गुरव, वंदना पुसाळकर, तृप्ती देशपांडे, पूजा शिराळकर, प्रिया मोहिते, आदिती गर्गे, मनीष कुलकर्णी, आशिष कोंगळेकर उपस्थित होते.

===Photopath===

230321\23kol_10_23032021_5.jpg~230321\23kol_11_23032021_5.jpg

===Caption===

फोटो (२३०३२०२१-कोल-ई-कचरा संकलन) : कोल्हापुरात मंगळवारी बिंदू चौक परिसरात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्यावतीने आयोजित अभियानात विशाल शिराळकर यांच्याकडे नागरिकांनी ई-कचरा जमा केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)फोटो (२३०३२०२१-कोल-ई-कचरा संकलन ०१) : कोल्हापुरात मंगळवारी बिंदू चौक परिसरात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्यावतीने ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. यावेळी डावीकडून  अभिजीत कुलकर्णी, परितोष उरकुडे, विशाल शिराळकर, युवराज गुरव, वंदना पुसाळकर, तृप्ती देशपांडे, पूजा शिराळकर, प्रिया मोहिते, आदिती गर्गे, मनीष कुलकर्णी, आशिष कोंगळेकर उपस्थित होते.~फोटो (२३०३२०२१-कोल-ई-कचरा संकलन) : कोल्हापुरात मंगळवारी बिंदू चौक परिसरात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्यावतीने आयोजित अभियानात विशाल शिराळकर यांच्याकडे नागरिकांनी ई-कचरा जमा केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)फोटो (२३०३२०२१-कोल-ई-कचरा संकलन ०१) : कोल्हापुरात मंगळवारी बिंदू चौक परिसरात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्यावतीने ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. यावेळी डावीकडून  अभिजीत कुलकर्णी, परितोष उरकुडे, विशाल शिराळकर, युवराज गुरव, वंदना पुसाळकर, तृप्ती देशपांडे, पूजा शिराळकर, प्रिया मोहिते, आदिती गर्गे, मनीष कुलकर्णी, आशिष कोंगळेकर उपस्थित होते.

Web Title: 800 kg e-waste collected in one day in Bindu Chowk area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.