८१ नवे कोरोना रुग्ण, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:34+5:302021-04-01T04:26:34+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ८१ रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरामध्ये ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला ...
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ८१ रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरामध्ये ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७३ झाली आहे. कोणाचाही मृत्यू नाही, ही दिलासादायक बाब आहे.
भुदरगड तालुक्यात एक, गडहिंग्लजमध्ये आठ, गगनबावडा एक, हातकणंगले नऊ, कागल तीन, करवीर आठ, पन्हाळा तीन, राधानगरी एक, शाहूवाडी एक, शिरोळ एक, नगरपालिका सहा, तर कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात २५ नवे रुग्ण सापडले आहेत. इतर जिल्ह्यातून आलेल्या १४ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसभरामध्ये ४४९ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर १४३६ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. १५३ अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे.