करवीरमध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून ८.१४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:23 PM2019-02-06T18:23:14+5:302019-02-06T18:26:55+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी आठ कोटी १४ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकातून दिली. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती, त्यानुसार रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१९-२० वित्तीय वर्षात सूचविले होते. सूचविलेल्या कामास मंजुरी देण्यात आली.
कोल्हापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी आठ कोटी १४ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकातून दिली. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती, त्यानुसार रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१९-२० वित्तीय वर्षात सूचविले होते. सूचविलेल्या कामास मंजुरी देण्यात आली.
राज्यमार्ग १७७ खुपीरे ते कुंभार वसाहत रस्ता सुधारण्यासाठी एक कोटी २६ लाख ६७ हजार व पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सात लाख ३६ हजार रुपये मंजूर झाले आहेत. म्हालसवडे रस्तासुधारण्यासाठी एक कोटी ६७ लाख नऊ हजार व देखभालीसाठी नऊ लाख २४ हजार रुपये, चाफोडीपैकी दोनवडी रस्त्यासाठी ५८ लाख ७३ हजार, तर देखभालीसाठी तीन लाख ३९ हजार रुपये उपलब्ध झाले आहेत.
हिरवडे खालसा रस्त्यासाठी ५३ लाख ७२ हजार, तर देखभालीसाठी तीन लाख ५२ हजार, सावरवाडी रस्त्यासाठी एक कोटी १४ लाख ३७ हजार व देखभालीसाठी सहा लाख २८ हजार रुपये, वेतवडे ते धनगरवाडा रस्त्यासाठी दोन कोटी ९४ लाख २३ हजार व देखभालीसाठी १९ लाख ६१ हजार रुपये मंजूर झालेले आहेत. सदरच्या कामांची लवकरच तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात करणार असल्याचे आमदार नरके यांनी पत्रकात म्हटले आहे.