प्रति चेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसांत ८१६ मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:37+5:302021-06-22T04:16:37+5:30

सदाशिव मोरे आजरा : तालुक्यात गेल्या ४ दिवसांत सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे, तर प्रति चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील ...

816 mm in 4 days in Kitwade area per Cherrapunji. The rain | प्रति चेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसांत ८१६ मि.मी. पाऊस

प्रति चेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसांत ८१६ मि.मी. पाऊस

Next

सदाशिव मोरे

आजरा

: तालुक्यात गेल्या ४ दिवसांत सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे, तर प्रति चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षांत इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच पावसाने तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरणे भरली आहेत, तर आजरा, गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दक्षिण टोकाला आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव आहे. या परिसरात प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस पडतो. चालूवर्षीही जून महिन्यात चार दिवस पडलेल्या उच्चांकी पावसाने धरणे भरली असून ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत.

मुसळधार पडलेल्या पावसाने भात पेरणी व टोकणणी केलेल्या जमिनीत पाणी तुंबले आहे,

तर आजरा परिसर व पश्चिम भागात भात रोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. किटवडे धनगरवाड्याच्या पठारावर प्रतिवर्षी कास पठाराप्रमाणे विविध प्रकारची फुलेही फुललेले असतात. या परिसरातील निसर्ग पर्यटकांना साद घालत असतो. पावसात ओलं चिंब भिजण्यासाठी पर्यटक प्रतिवर्षी येत असतात. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांत निसर्गाचा आस्वाद घेण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला व सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले किटवडे, घाटकरवाडी, सुळेरान व आंबाडे हा परिसर पाहण्यासाठी प्रतिवर्षी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी असते.

आजरा-आंबोली मार्गावर घाटकरवाडी फाट्यापासून ३ कि. मी. अंतरावर किटवडे हे गाव असून अतिवृष्टी व फुलणाऱ्या फुलांमुळे काही तरुणांना रोजगारही मिळाला आहे.

किटवडे परिसरात गेल्या चार वर्षांत १६ ते १९ जूनदरम्यान पडलेला पाऊस.

२०१८ - १२० मि.मी. २०१९ - ८० मि.मी. २०२० - २१० मि. मी. २०२१ - ८१६ मि. मी.

चौकट :

आजरा तालुक्यात गेल्या चार वर्षांत १६ ते १९ जूनदरम्यान पडलेला सरासरी पाऊस

२०१८ - १२ मि. मी. २०१९ - ६ मि. मी. २०२० - १९० मि. मी. २०२१ - ४३७ मि. मी.

चौकट : किटवडे परिसरातील जूनअखेरचा चार वर्षांतील पाऊस २०१८ - ९१२ मि. मी. २०१९ - ४९१ मि. मी. २०२० - १४०६ मि. मी. २०२१ - १९४६ मि. मी. (२० जून २०२१ अखेर)

Web Title: 816 mm in 4 days in Kitwade area per Cherrapunji. The rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.