‘महावितरण’ची उच्चांकी ८.२५ कोटींची वसुली

By admin | Published: November 13, 2016 12:56 AM2016-11-13T00:56:59+5:302016-11-13T01:17:50+5:30

वीज बिले भरण्यासाठी झुंबड : उद्या मध्यरात्रीपर्यंत केंद्र सुरू राहणार

8.25 crore recovery of Mahavitaran | ‘महावितरण’ची उच्चांकी ८.२५ कोटींची वसुली

‘महावितरण’ची उच्चांकी ८.२५ कोटींची वसुली

Next

कोल्हापूर : केंद्र शासनाचा मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय महावितरण कंपनीच्याही चांगलाच पथ्यावर पडला आहे. महावितरणकडे शुक्रवारी (दि. ११) एका दिवसात सर्व प्रकारच्या बिलांपोटी तब्बल ८ कोटी २४ लाख रुपये रोख जमा झाले. शनिवारीही दिवसभर लोकांची बिले भरण्याची झुंबड होती; परंतु किती रक्कम जमा झाली, हे समजू शकले नाही.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महावितरणची सर्व बिले भरणा केंद्र आज, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर उद्या, सोमवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
महावितरणचे कोल्हापुरात परिमंडळ कार्यालय आहे. त्याअंतर्गत घरगुती, औद्योगिक, वाणिज्य व कृषी अशा चारही प्रकारचे कोल्हापूर जिल्ह्णात १० लाख, तर सांगली जिल्ह्यात आठ लाख ग्राहक आहेत. त्यातील अनेक ग्राहक आॅनलाईन बिले भरतात; परंतु त्यांचा या रकमेत हिशेब नाही. महावितरणकडे एका दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोन कोटी रुपये बिलापोटी जमा होतात. त्याच्या तिप्पट रक्कम प्रत्यक्षात शुक्रवारी जमा झाली. सांगलीत ८० लाख रुपये जमा होतात. हा आकडा सव्वादोन कोटींवर पोहोचला आहे. वीजबिल वसुलीसाठी कित्येक मोहिमा राबविल्या तरी आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि तीदेखील एकाच दिवसात एवढ्या मोठ्या रकमेची कधीच वसुली झालेली नाही. त्यामुळे या निर्णयाचा सामान्य जनतेला रांगेत उभे राहून त्रास होत असला तरी शासकीय-निमशासकीय यंत्रणांना मात्र चांगलाच फायदा होऊ लागला आहे. ही वसुली अशीच झाली तर पुढच्या दोन दिवसांत या परिमंडळात महावितरणचे कोणी थकबाकीदारच राहणार नाहीत.

Web Title: 8.25 crore recovery of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.