गगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:32 PM2020-07-16T19:32:54+5:302020-07-16T19:34:51+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 83.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 7.13 एकूण 175.38 मिमी, शिरोळ- 7.43 एकूण 173.14 मिमी, पन्हाळा- 14.57 एकूण 538.14 मिमी, शाहूवाडी- 20 एकूण 764.33 मिमी, राधानगरी- 35.33 एकूण 779 मिमी, गगनबावडा- 83.50 मिमी एकूण 2006.50 मिमी, करवीर- 10.82 एकूण 401.09 मिमी, कागल- 27.43 एकूण 535.71 मिमी, गडहिंग्लज- 11.71 एकूण 367.43 मिमी, भुदरगड- 17.80 एकूण 639 मिमी, आजरा- 16.75 एकूण 874.75 मिमी, चंदगड- 8.50 मिमी एकूण 788.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग कोयनेतून 2222; 5 बंधारे पाण्याखाली
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 140.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1450, कोयना धरणातून 2222 तर अलमट्टी धरणातून 46130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर, रुई व इचलकरंजी, भोगावती नदीवरील खडक कोगे असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 44.27 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 89.013 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
तुळशी 50.25 दलघमी, वारणा 541.06 दलघमी, दूधगंगा 437.81 दलघमी, कासारी 42.61 दलघमी, कडवी 36.57 दलघमी, कुंभी 44.05 दलघमी, पाटगाव 68.68 दलघमी, चिकोत्रा 20.58 दलघमी, चित्री 23.99 दलघमी, जंगमहट्टी 19.88 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 17.4 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39 फूट, शिरोळ 31.9 फूट, नृसिंहवाडी 25 फूट, राजापूर 14.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 7.7 फूट अशी आहे.
00५