'शरद'मध्ये टेक्नोक्रेट स्पर्धेत ८६४ विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:33+5:302021-06-26T04:17:33+5:30
स्पर्धेचे उद्घाटन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य बी. एस. ताशीलदार उपस्थित होते. स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या ...
स्पर्धेचे उद्घाटन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य बी. एस. ताशीलदार उपस्थित होते. स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागाचा 'सोलर बेसड व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टिम' हा प्रकल्प, मेकॅनिकल विभागाचा 'ऑटोमेटिक स्मार्ट व्हिलचेअर', सिव्हिल विभागाचा 'सॅटेलाईट टाऊन (स्मार्ट सिटी)' हा प्रकल्प, आयटी विभागाचा 'अॅन्डॉईड बेसड व्हाईस असिस्टंट अॅप फॉर ब्लांइड पीपल', इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या 'एनर्जी मॅनेजमेंट सिस्टिम विथ अॅक्सिडेंटल प्रोटेक्शन' हा प्रकल्प तसेच कॉम्प्युटर विभागात एम. एच. साबो सिद्दीकी पॉलिटेक्निकच्या 'कोविड १९ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप्लिकेशन' या प्रकल्पांनी त्या-त्या विभागात प्रथम क्रमांक मिळविले आहेत. यावेळी द्वितीय व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे मिनी प्रोजेक्ट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे समन्वय प्रा. ए. के. मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर. आर. पाटील, तर एस. एस. माळी यांनी आभार मानले.