बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:22+5:302021-06-02T04:20:22+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बिम्स हॉस्पिटलमध्ये ब्लॅक फंगसच्या ४९ रुग्णांवर उपचार ...

87 patients of black fungus in Belgaum district | बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण

Next

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

बिम्स हॉस्पिटलमध्ये ब्लॅक फंगसच्या ४९ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी १0 रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. याव्यतिरिक्त विविध सहा खाजगी हॉस्पिटल्समध्ये ब्लॅक फंगसच्या ३८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी समर्पक प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांत औषधांचा अतिरिक्त साठा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर शेकडा ११ टक्के इतका आहे. गेल्या २४ मेपासून ग्रामीण भागात गावोगावी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत असून, आजवर ८00 खेड्यांमध्ये या टेस्ट झाल्या आहेत. रॅपिड अँटिजन टेस्टमुळे व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याची तात्काळ शहानिशा होते. त्यामुळे लवकर उपचार करण्यास आणि बळींची संख्या रोखण्यास मदत होत आहे. या टेस्ट करण्यासाठी जिल्ह्यात १३५ पथकांची रचना करण्यात आली असून, सर्व खेडेगावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

Web Title: 87 patients of black fungus in Belgaum district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.