शियेत ८८ उमेदवारी अर्ज पात्र, सात अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:21+5:302021-01-01T04:17:21+5:30
शिये (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीसाठी सतरा जागांसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. येथील अतिक्रमणाचा प्रश्न शेतकरी संघटनेने ...
शिये (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीसाठी सतरा जागांसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. येथील अतिक्रमणाचा प्रश्न शेतकरी संघटनेने उपस्थित केल्याने परिसरातील सर्व ग्रामपंचायतींचे याकडे लक्ष लागून राहिले होते. संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन प्रशासनाने शिये ग्रामपंचायत सर्वात शेवटी अर्ज छाननीवेळी ठरवली होती. अतिक्रमण प्रश्न उपस्थित झाल्याने कायदेशीर बाजू मांडण्याकरिता सत्ताधारी व विरोधी गटाकडून ॲड. किरण पाटील व ॲड. प्रशांत पाटील यांनी काम पाहिले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी २२ इच्छुक उमेदवारांविरुद्ध अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्र ठरवण्याची मागणी करत आपला विरोध नोंदविला. यावेळी करवीरच्या तहसीलदार डॉ. शीतल मुळे - भांबरे यांनी याबाबत विभागीय अधिकारी निर्णय घेतील असे सांगितले.
अतिक्रमणाच्या प्रश्नावरून उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्याची मागणी करणारे ॲड. माणिक शिंदे यांनी २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. त्याच्या खर्चाची माहिती वेळेत निवडणूक विभागाला न दाखविल्याने शिंदे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.