शेतकरी संघाची ‘८८’ अखेर चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:07+5:302020-12-12T04:41:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची सहकार कलम ८८ नुसार चौकशी होणार असून २०१८-१९ मध्ये शाखांमध्ये झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची सहकार कलम ८८ नुसार चौकशी होणार असून २०१८-१९ मध्ये शाखांमध्ये झालेल्या अपहारांसह इतर बाबींवर लेखापरीक्षकांनी ठपके ठेवले आहेत. जबाबदारी निश्चित करण्यासाठी सी. ए. आर. के. गणाचार्य यांची शुक्रवारी सहकार विभागाने नेमणूक केली आहे.
शेतकरी संघाचा कारभार गेली दोन-तीन वर्षे वादात सापडला आहे. संघाच्या अनेक शाखांत अपहाराची मालिकाच सुरू होती. संचालकाने गूळ अडत दुकानातून लाखो रुपये ॲडव्हान्समध्ये उचल केली आहे. संघाच्या इतर कारभाराविरोधात माजी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे वारंवार तक्रारीही केल्या आहेत. त्याचबरोबर २०१८-१९ च्या लेखापरीक्षण अहवालात कारभाराविषयी ठपके ठेवले होते. लेखापरीक्षकांनी विशेष अहवाल करीत कलम ८८ नुसार कारवाई करण्याची शिफारस सहकार विभागाकडे केली होती. त्यानुसार पहिल्यांदा शहर उपनिबंधक प्रकाश जगताप यांची चौकशी करून जबाबदारी निश्चितीसाठी नेमणूक केली होती. मात्र त्यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर सी. ए. आर. के. गणाचार्य यांची नेमणूक केली.
याची आहेत ठपके-
रिझर्व्ह फंड गुंतवणूक
शाखांतील अपहार
गुळाचे ॲडव्हान्स
शासन लाभांश देणे
- राजाराम लोंढे