शिरोलीरत्न पुरस्काराने ८९ जणांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:33+5:302021-08-18T04:29:33+5:30
शिरोली : महापूर आणि कोरोना काळात चांगले काम केलेल्या पोलीस, आरोग्य, महावितरण ग्रामपंचायत कर्मचारी, अशा एकूण ८९ जणांना "शिरोलीरत्न"पुरस्कार ...
शिरोली :
महापूर आणि कोरोना काळात चांगले काम केलेल्या पोलीस, आरोग्य, महावितरण ग्रामपंचायत कर्मचारी, अशा एकूण ८९ जणांना "शिरोलीरत्न"पुरस्कार देऊन शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते; तर प्रमुख पाहुणे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले होते.
गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. या महापुरात शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले व त्यांच्या टीमने चार-पाच दिवस महामार्गावर चांगले काम करून लोकांची सेवा केली. महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अमिर मणेर आणि त्यांच्या टीमने गावातील बंद पडलेला वीजपुरवठा महापुराच्या पाण्यातून जाऊन सुरू केला; तर महापुराने नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण आणि शेतीचे पंचनामे लवकर केल्याबद्दल संदीप पुजारी, कृषी सहायक प्रमोद कांबळे, तसेच कोरोना काळात चांगले काम केले आणि लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन केले होते. या सर्वांच्या कार्याचा गौरव म्हणून शिरोली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. फारूख देसाई, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज आणि आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, उद्योजक, आदर्श शिक्षक, शेतकरी यांच्यासह ८९ जणांचा ‘शिरोलीरत्न’ पुरस्कार देऊन गौरव केला. यावेळी उपसरपंच सुरेश यादव, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. भोगण, तलाठी निलेश चौगुले,
ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, संग्राम कदम, प्रकाश कौंदाडे, बाजीराव पाटील, सरदार मुल्ला, विनायक कुंभार, सलीम महात, मुन्ना सनदे, पुष्पा पाटील, उर्मिला जाधव, मीनाक्षी खटाळे, राजश्री उन्हळे, अनिता कांबळे, श्वेता गुरव, बाबासाहेब कांबळे, म्यामतबी मुल्ला उपस्थित होते.
फोटो : १७ शिरोली गौरव
महापूर व कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याने शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने डॉ. जेसिका अँड्र्युज यांचा सरपंच शशिकांत खवरे यांच्याहस्ते ‘शिरोलीरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपसरपंच सुरेश यादव, विनायक कुंभार उपस्थित होते.