संगम माहुलीतील महाराणी ताराराणींच्या समाधीसाठी ९२ लाखांचा आराखडा
By admin | Published: April 9, 2017 04:42 PM2017-04-09T16:42:54+5:302017-04-09T16:42:54+5:30
मंत्री विजय शिवतारे यांचे आदेश
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ : करवीर संस्थानच्या संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील समाधीचा ९२ लाख ४६ हजार रूपयांचा ढोबळ आराखडा नियोजन समितीमध्ये सादर करण्याचे आदेश साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी दिले. शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ही माहिती दिली.
या समाधीच्या जीर्णोध्दारासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी ९ मे २0१६ रोजी परवानगी दिली होती. यानंतर मंत्री शिवतारे यांनी याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी हा आराखडा सादर करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.
याबाबत रविवारी देवणे यांनी मंत्री शिवतारे यांची भेट घेऊन त्यांना हा आराखडा सादर केला. यानंतर मंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांना विश्वासात घेऊन नाविन्यपूर्ण योजनेतून हे काम प्रस्तावित करण्याचे आदेश दिले.