शिरोळ तालुक्यासाठी ९ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:58+5:302021-03-20T04:21:58+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यामध्ये विविध खात्यांतर्गत विकास योजना राबविण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आरोग्य ...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यामध्ये विविध खात्यांतर्गत विकास योजना राबविण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीकडून जनसुविधा, नागरी सुविधा व क वर्ग तीर्थस्थळांसाठी ३ कोटी ५० लाख रुपये, आमदार स्थानिक विकास निधी रुपये ३ कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे यासाठी १ कोटी रुपये, ३०५४ योजनेमधून १ कोटी रुपये तसेच खिद्रापूर येथील ऊर्दू शाळेच्या नव्याने तीन खोल्या बांधकामासाठी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शासनाच्या विविध योजनांमधून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळातही विकास निधी खेचून आणून विकास केला जाईल, असेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.