कोल्हापूर विभागातील ९० टक्के एस. टी. वाहतूक बंद, संपामुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:38 AM2018-06-08T11:38:19+5:302018-06-08T11:38:19+5:30
कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले.
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने चार वर्षांच्या करारापोटी चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. मात्र, ही वेतनवाढ काही एस. टी. कर्मचाऱ्यांना अमान्य असल्याने शुक्रवारपासून स्वत:हून ते संपात सहभागी झाले आहेत. या संपाला कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले.
राज्य परिवहन महामंडळाने चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ दिली. मात्र, ती फसवी असून, याला विरोध करताच आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर दबाब आणला जात असल्याचा आरोप करत असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून कोणत्याही संघटनेशी बांधील न राहता संपात सहभागी होण्याचा निर्णय काही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
याबाबत सोशल मिडीयवर प्रचार - पसार करण्यात आला. त्यानुसार मध्यरात्री पासून कोल्हापूर विभागातील कर्मचारी संपात सहभागी होवू लागलेत.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकत्र येवून त्यांनी शांतपणे संपात सहभागी आहोत, हे दर्शवित होते. अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांच्या मात्र हाल झाले.
मे महिन्याची सुट्टी संपत आल्याने प्रवाशी परतीचा प्रवास करत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामध्ये एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. तरी परगावचे प्रवाशी बसस्थानकांवर अडकून पडले. यांचा फायदा खासगी बस वाहतूकरदारांनी घेतल्याचे चित्र बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले.
सकाळी अकरा पर्यंत फक्त ३३ गाड्या रस्त्यांवर
कोणताही संघटनेचा यामध्ये सहभागी नसला तरी कामगारांनी उत्सफुर्तेपणे संपाला पाठिंबा दिल्याचे चित्र कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. ७१९ गाड्यापैकी फक्त ३३ गाड्या पुणे, बेळगाव यासह ज्या ठिकाणी प्रवासी जादा आहेत. त्या मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या.
मात्र एस.टी. कामगार सेना व महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या पदाधिकारी संपात सहभागी न होता. कामवर हजर होते. प्रशासन त्यांच्या मार्फत गाड्याचे नियोजन करताना दिसून येत होते.