शिवाजी विद्यापीठ परिसरात स्वर्गीय नर्तक, बोनेल्स ईगलसह पक्ष्यांच्या ९० प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:18+5:302021-01-19T04:26:18+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात स्वर्गीय नर्तक, बोनेल्स ईगलसह १२३ पृष्ठवंशीय पशुपक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या. विद्यापीठाच्या ‘रिसर्च स्ट्रेन्दनिंग ...

90 species of birds including late dancer, Bonnell Eagle on Shivaji University campus | शिवाजी विद्यापीठ परिसरात स्वर्गीय नर्तक, बोनेल्स ईगलसह पक्ष्यांच्या ९० प्रजाती

शिवाजी विद्यापीठ परिसरात स्वर्गीय नर्तक, बोनेल्स ईगलसह पक्ष्यांच्या ९० प्रजाती

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात स्वर्गीय नर्तक, बोनेल्स ईगलसह १२३ पृष्ठवंशीय पशुपक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या. विद्यापीठाच्या ‘रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम’अंतर्गत प्राणिशास्र अधिविभागातील डॉ. एस.एम. गायकवाड यांनी त्याबाबत संशोधन केले. त्यामुळे विद्यापीठ परिसराच्या जैवविविधतेला मोठी पुष्टी लाभली आहे.

विद्यापीठाने ‘रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम’ अधिविभागातील संशोधकांसाठी घोषित केली आहे. त्या योजनेअंतर्गत ‘स्टडिज ऑन डायव्हर्सिटी ऑफ व्हर्टिब्रेट्स इन द शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस’ हा प्रकल्प प्राणिशास्र अधिविभागातील डॉ. एस. एम. गायकवाड यांना मंजूर झाला. त्या अंतर्गत त्यांनी विद्यापीठ परिसरात सुमारे वर्षभर सातत्यपूर्ण पाहणी करून विविध पृष्ठवंशीय प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. सरिसृप, उभयचर, पक्षी आणि सस्तन अशा चार प्रकारांत त्यांची विभागणी करून नोंदी घेतल्या. त्यामध्ये सरिसृप वर्गाच्या एकूण १३ प्रजाती, सापांच्या एकूण सहा प्रजाती आढळल्या. त्यात तस्कर (कॉमन ट्रिंकेट स्नेक) या दुर्मीळ प्रजातीचा सापही परिसरात आढळला. त्याशिवाय सरडे व पालींच्या सहा, कासवाची एक, पक्ष्यांच्या सुमारे ९० प्रजाती आढळल्या आहेत. त्यात थापट्या बदक, शुवई बदक, ब्राह्मणी बदक, छोट्या कंठाचा चिखल्या, स्वर्गीय नर्तक या पाच स्थलांतरित प्रजाती, तीन स्थानिक स्थलांतरित प्रजाती आढळल्या. गरुडाच्या ही बोनेल्स ईगल, क्रेस्टेड सर्पंट ईगल या दोन प्रजाती आढळल्या असून, अन्य शिकारी पक्ष्यांच्या आठ प्रजाती आढळल्या आहेत. उभयचर प्राण्यांच्या ११ प्रजाती विद्यापीठ परिसरात आढळल्या. त्यात बेडकांच्या सुमारे दहा प्रजाती आढळल्या. बलून फ्रॉग या दुर्मीळ बेडकाची नोंद आहे. सस्तन प्राण्यांच्या नऊ, वटवाघळाच्या तीन, साळिंदराची एका प्रजातीची नोंद आहे.

प्रतिक्रिया

रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम ही विद्यापीठातील संशोधकांना उपयुक्त संशोधनासाठी प्रेरित करणारी योजना असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाचा परिसर हा जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यावर डॉ. गायकवाड यांचे संशोधन नेमकेपणाने प्रकाशझोत टाकते.

-डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरु

प्रतिक्रिया

विद्यापीठाने प्रदान केलेल्या रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीममुळेच हे संशोधन करणे शक्य झाले. या संशोधनाचा सविस्तर अहवाल विद्यापीठास सादर केला. भविष्यात या संदर्भात अधिक व्यापक संशोधन करण्याचा मानस आहे.

-डॉ. एस.एम. गायकवाड

फोटो (१८०१२०२१-ब्राह्मणी बदक, स्वर्गीय नर्तक, क्रेस्टेड सर्पंटाईन ईगल, छोट्या कंठाचा चिखल्या, बलून फ्रॉग, कॉमन ट्रिंकेट स्नेक

फोटो (१८०१२०२१-कोल-एस एम गायकवाड (विद्यापीठ)

Web Title: 90 species of birds including late dancer, Bonnell Eagle on Shivaji University campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.