जिल्ह्यात जानेवारीपासून ९०९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:12+5:302021-05-11T04:25:12+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये १ जानेवारी ते ९ मे २०२१ या कालावधीत ९०९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ...

909 deaths in the district since January | जिल्ह्यात जानेवारीपासून ९०९ मृत्यू

जिल्ह्यात जानेवारीपासून ९०९ मृत्यू

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये १ जानेवारी ते ९ मे २०२१ या कालावधीत ९०९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक १९९ जणांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल अन्य राज्ये आणि अन्य जिल्ह्यांतील १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या कमी करणे हे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासमोरचे मोठे आव्हान आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा मृतांची संख्या दुसऱ्या लाटेमध्ये कमी कालावधीत आणि झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ३० टक्क्यांहून अधिक मृत पावलेले रुग्ण हे ६१ ते ७० या वयोगटातील असून, त्याखालोखाल ५१ ते ६० वयोगटांतील २२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ५६५ पुरुषांचा, तर ३४४ महिलांचा समावेश आहे.

मृतांमधील तब्बल ३९ टक्के रुग्ण हे पाच दिवसांचा उपचार घेतल्यानंतर मृत्यू पावल्याचे स्पष्ट होत असून, त्याखालोखाल मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांत झाले आहेत. त्यांचे प्रमाण २२.११ टक्के इतके आहे. येथील सीपीआर रुग्णालयात २६८ जणांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयामध्ये २५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुका मृत

आजरा ०२८

भुदरगड ०१८

चंदगड ००७

गडहिंग्लज ०३६

गगनबावडा ००२

हातकणंगले १०६

कागल ०२३

करवीर १०५

पन्हाळा ०२८

राधानगरी ०१३

शाहूवाडी ०३७

शिरोळ ०४८

नगरपालिका क्षेत्र ०९६

कोल्हापूर महापालिका १९९

इतर जिल्हे १६३

एकूण ९०९

चौकट

सातत्याने ऑक्सिजनची तपासणी आवश्यक

सध्या कमी वयाच्या तरुणांनाही कोरोनाचा धोका जाणवू लागला आहे. अशा तरुण रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात. नेहमीप्रमाणे काम करताना थकवाही जाणवत नाही. परंतु, अचानक ऑक्सिजनची पातळी कमी येते. ती आधीपासून कमी होत असते. परंतु, तपासणी न केल्याने ते कळत नाही. ऑक्सिजनची पातळी अगदीच खाली आल्यानंतर मग धावपळ करावी लागते. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे दिवसातून तीन वेळा ऑक्सिजनची पातळी तपासणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 909 deaths in the district since January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.