९१ वर्षीय वृद्धेची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:37+5:302021-06-03T04:17:37+5:30
गावात दुसऱ्या लाटेत एकूण १५१ रुग्णसंख्या झाली आहे. १३२ रुग्णांना बरे करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर सहा जणांचा ...
गावात दुसऱ्या लाटेत एकूण १५१ रुग्णसंख्या झाली आहे. १३२ रुग्णांना बरे करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामसमितीने कोरोना प्रतिबंध करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. नाईक यांना १५ दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. तद्नंतर त्यांना कुंजवन कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांनी बाहेर पडल्यानंतर त्यांना चिंचवाडमधील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या वयातही कोरोनावर मात केल्याने ग्रामस्थांमधील भीती काहीशी दूर झाली आहे.
-------------------
कोट - गावातील वाढती रुग्णसंख्या धोक्याची आहे. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचे कोरोना प्रतिबंधासाठी मोठे योगदान आहे. नाईक यांच्या या वयातील प्रतिकार शक्तीने ग्रामस्थांना आजाराविषयी न्यूनगंड कमी झाला आहे.
- परमानंद उदगावे, ग्रा.पं. सदस्य
-----
फोटो - ०२०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - चिंचवाड (ता. शिरोळ) येथील शाराबाई नाईक या कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परमानंद उदगावे, ग्रामसेवक हनवते, आरोग्य सेवक मुजावर, शुभांगी माजगावे, गीता घाटगे, विजय गोधडे उपस्थित होते.