लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टींना ९१ हजाराची मदत, शेतकरी कुटुंबाची कृतज्ञता
By विश्वास पाटील | Published: February 29, 2024 01:09 PM2024-02-29T13:09:01+5:302024-02-29T13:10:01+5:30
कोल्हापूर : नांदणी ता. शिरोळ येथील भुपाल माणगावे यांचा आज ९१ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा मुलगा राजेंद्र माणगांवे ...
कोल्हापूर : नांदणी ता. शिरोळ येथील भुपाल माणगावे यांचा आज ९१ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा मुलगा राजेंद्र माणगांवे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवडणुकीसाठी ९१ हजारांचा निधी त्यांच्याकडे सुपर्द केला.
शेट्टी म्हणाले, राजेंद्र मानगावे यांचा दोन दिवसापुर्वी फोन आला व त्यांनी सांगितले, २८ तारखेला वडिलांचा ९१ वा वाढदिवस कुटूंबियाच्यावतीने साजरा करणार आहोत आपण सायंकाळी भेट देवून शुभेच्छा देवून जावे. याप्रमाणे मी बुधवारी रात्री नांदणी येथील माणगावेकोडी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो. आई वडील दोघानांही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिम्मित माणगावे कुटूंबियाने चक्क लोकसभा निवडणुकीसाठी ९१ हजार रूपयाची लोक वर्गणी त्यांनी माझ्याकडे सुपुर्द केली.
लोकसभेच्या २००४ पासून हे कुटुंबिय सातत्याने चळवळीसोबत राहिले आहे. गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी ५१ हजार रूपयाची देणगी दिली होती. आज वडीलांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांनी ९१ हजार रूपयाची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देवून चळवळीस बळ देण्याच काम केल आहे. चळवळीवर प्रेम करणा-या अशा लोकांमुळेच मी गेल्या ३० वर्षापासून उजळ माथ्याने सांगत आलो आहे कि “मी जन्माला आलो त्यावेळेस माझा हात स्वच्छ होता, ज्यावेळेस शेवटचा श्वास घेईन तेंव्हासुध्दा दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही.