कोल्हापूर विभागातील ९१२ संस्था ‘बेपत्ता’

By admin | Published: October 29, 2015 12:20 AM2015-10-29T00:20:18+5:302015-10-29T00:29:35+5:30

सर्वेक्षण पूर्ण : ३२२५ संस्थांना कायमचे कुलूप लागणार; संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू

912 organizations 'missing' in Kolhapur division | कोल्हापूर विभागातील ९१२ संस्था ‘बेपत्ता’

कोल्हापूर विभागातील ९१२ संस्था ‘बेपत्ता’

Next

राजाराम लोंढे== कोल्हापूर विभागातील तब्बल ९१२ सहकारी संस्था ‘बेपत्ता’ झाल्या असून, सर्वेक्षणामध्ये या संस्थांचा ठावठिकाणाच सापडलेला नाही. सर्वाधिक ७६३ संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील असून, विभागातील तब्बल ३२२५ संस्थांचे कामकाज बंद असल्याची माहितीही पुढे आली आहे. या संस्थांना नोटिसा लागू करून त्या अवसायनात काढण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे.
मागील पंधरा ते वीस वर्षांच्या काळात राज्यात सहकारी संस्थांचे वाटप खिरापतीसारखे झाले होते. यात विकास संस्था, हौसिंग, पतसंस्था, आदी वर्गवारीतील संस्थांचा मोठ्या प्रमाणात भरणा होता. केवळ जिल्हास्तरीय संस्थांच्या निवडणुकीत ठरावाचे राजकारण करण्यासाठी या काळात मोठ्या प्रमाणात संस्था उभ्या राहिल्या; पण प्रत्यक्षात काहीच कामकाज होत नव्हते. राज्यात एक वर्षापूर्वी महायुतीचे सरकार आल्यापासून त्यांनी सहकाराच्या शुद्धिकरणाची मोहीम हातात घेतली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून सहकारी काम बंद असलेल्या बोगस संस्थांची शोधमोहीम हाती घेतली आहे. सप्टेंबरअखेर संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्यानुसार कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून ३२२५ संस्थांना कुलूप लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यामधील ९१२ संस्थांचा पत्ताच सहकार विभागातील अधिकाऱ्यांना सापडलेला नाही; तर १२८४ संस्था बंद अवस्थेत आढळलेल्या आहेत. १०२९ संस्थांचे कार्य स्थगित असल्याचे स्पष्ट झाले आहे.



दोन्ही काँग्रेसच्या सत्ताकेंद्रावर हल्ला
‘सहकार’ हा कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शक्तिस्थळ आहे. राज्यात सत्तांतर झाले तरी जिल्हा पातळीवरील संस्थांमध्ये भाजप-शिवसेनेला शिरकाव करता आलेला नाही. केवळ मतदानासाठी स्थापन केलेल्या या संस्था बंद करून दोन्ही कॉँग्रेसचे शक्तिस्थळ कमकुवत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अशी होणार कारवाई...
ठावठिकाणा नसलेल्या संस्थांना
जाहीर नोटीस काढणार
महिन्यात अवसायनात काढल्याचा मध्यंतरी आदेश
प्रतिसाद न मिळाल्यास थेट अवसायक नेमणुकीचा अंतिम आदेश



जिल्हाएकूणसर्वेक्षण चालूबंदकार्यठावठिकाणा
संस्थापूर्ण संस्थासंस्था स्थगितनसलेल्या
कोल्हापूर८७८२८७०१६६६६६०६६६६७६३
सांगली४०८९४०८९३३३०३३४३०४१२१
सातारा४६६५४६६५३८७७३४४५९२८
एकूण१७५३६१७४५५१३८७३१२८४१०२९९१२



सर्वेक्षणाचा अहवाल आला असून, बंद, कार्यस्थगित व ठावठिकाणा नसलेल्या संस्थांवर अवसायक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नोटिसीला प्रतिसाद देऊन संस्था सुरू करण्यास कुणी पुढे आले तर त्यांना संधी दिली जाणार आहे.
- राजेंद्र दराडे
(विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर)


बंद संस्थांवर अवसायक नेमणुकीची
प्रक्रिया सुरू
अशा प्रकारे झाले सर्वेक्षण
संस्थेचा नोंदणी क्रमांक, वर्गीकरण, संस्थेचा पत्ता, कार्यक्षेत्र, शेवटच्या लेखापरीक्षणाचे वर्ष व वर्गवारी, वसूल भागभांडवल, नफा-तोटा, शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, संचालक मंडळाची निवडणूक, बॅँक खात्यावरील व्यवहार

Web Title: 912 organizations 'missing' in Kolhapur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.