जिल्ह्यातील ९३ ग्रा. पं. बांधकाम, दुरुस्तीसाठी ९ कोटी ३२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:43+5:302021-04-16T04:23:43+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या बांधकाम, दुरुस्तीसाठी ९ कोटी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील २५ गावांमध्ये ...

93 g in the district. Pt. 9 crore 32 lakhs for construction and repair | जिल्ह्यातील ९३ ग्रा. पं. बांधकाम, दुरुस्तीसाठी ९ कोटी ३२ लाख

जिल्ह्यातील ९३ ग्रा. पं. बांधकाम, दुरुस्तीसाठी ९ कोटी ३२ लाख

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या बांधकाम, दुरुस्तीसाठी ९ कोटी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील २५ गावांमध्ये नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र खोल्या बांधण्यात येणार असून, त्यासाठीच्या निधीचाही यामध्ये समावेश आहे.

नवीन ग्रामपंचायती बांधण्यासाठी सर्वाधिक गावे ही कागल तालुक्यातील आहेत. या गावांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत हा निधी देण्यात येणार आहे.

कागल तालुक्यातील म्हाकवे, वडगाव, शिंदेवाडी, सोनाळी, हमिदवाडा, लिंगनूर कापशी, गोरंबे, अर्जुनवाडा, गलगले, आलाबाद, करनूर, भडगाव, हसुर बु. नंद्याळ, केंबळी, फराकटेवाडी, बाचणी, बेलवळे खु., ठाणेवाडी, खडकेवाडा या ग्रामपंचायतींसाठी निधी मंजूर झाला आहे. आजरा तालुक्यातील मासेवाडी, भादवणवाडी, होन्याळी, बेलेवाडी हुबळगी, चंदगड तालुक्यातील कुदनूर, करवीर तालुक्यातील कांचनवाडी, कळंबे तर्फ ठाणे, शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव, हातकणंगले तालुक्यातील भादोले, राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी, कासारवाडा, शिरगाव, तरसंबळे, गडहिंग्लज तालुक्यातील जखेवाडी या ग्रामपंचायतींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

चौकट

दुरूस्तीसाठी प्रत्येकी चार लाख रूपये

ग्रामपंचायत दुरूस्तीसाठी खालील ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कडवे, शेणवडे, तळीय बु. खेरिवडे, साळवण (ता. गगनबावडा), राजापूर (ता. राधानगरी), सावतवाडी नेसरी, कडाल, डोणेवाडी, तारेवाडी, चंदनकुड (ता. गडहिंग्लज), नागनवाडी, व्हनगुत्ती, नवले, देवकेवाडी (ता. भुदरगड), जाधेवाडी, हाजगोळी खु. कर्पेवाडी, मसोली, खानापूर, खोराटवाडी (ता. आजरा), कुंभारवाडी, बोंगेवाडी, सोमवार पेठ, साळवाडी, गिरोली, वेखंडवाडी, निकमवाडी, बांदेवाडी, आंबार्डे, नेबापूर, महाडिकवाडी (ता. पन्हाळा), नितवडे (ता. करवीर) यांचा समावेश आहे.

चौकट

या ग्रामपंचायतींना एक खोली मंजूर

ज्या ग्रामपंचातींच्या सध्याच्या इमारतीमध्ये अडचण आहे, अशा ग्रामपंचायतींना नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र खोली बांधण्यासाठी चार लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये तुडये, माणगाव (ता. चंदगड), वडणगे, निटवडे, हलसवडे (ता. करवीर), भादोले, वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले), टाकवडे, घोसरवाड (ता. शिरोळ), हंबरवाडी, मडिलगे (ता. भुदरगड), निढोरी, सावर्डे बु. आणूर, मांगनूर, फराकटेवाडी, सोनगे, सावर्डे खु. बाळेघोळ, मळगे बु. (ता. कागल), शिप्पूर, जखेवाडी, गिजवणे (ता. गडहिंग्लज), मासेवाडी, मुमेवाडी (ता. आजरा) यांचा समावेश आहे.

Web Title: 93 g in the district. Pt. 9 crore 32 lakhs for construction and repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.