जिल्ह्यात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:31+5:302021-07-16T04:18:31+5:30

कोल्हापूूर: रिमझिम का असेना, पण पावसाचे पुनरागमन झाल्याने खोळंबलेल्या उर्वरित पेरण्यादेखील बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने जिल्ह्याचे पेरक्षेत्र ९४ टक्केवर गेले ...

94% sowing completed in the district | जिल्ह्यात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

जिल्ह्यात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

Next

कोल्हापूूर: रिमझिम का असेना, पण पावसाचे पुनरागमन झाल्याने खोळंबलेल्या उर्वरित पेरण्यादेखील बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने जिल्ह्याचे पेरक्षेत्र ९४ टक्केवर गेले आहे. दुबार पेरणीचे संकटही पूर्ण टळले आहे. आता भूईमूग, सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, भातही कांडी धरु लागले आहे. भात व नाचणीची रोप लागणीही बऱ्यापैकी आवरत आली आहे.

गेल्या पंधरवड्यात ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसलेला मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यापाठोपाठ वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनमुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यात पेरणीचा आकडा ७० टक्केवर पोहोचला होता. भात व नाचणीची रोप लागण सुरू झाल्या असतानाच अचानक पावसाने जी दडी मारली ती गेले दोन आठवडे परतलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पिके धाेक्यात आली होती. शेतकरी चिंतेत असतानाच पाऊस परतला आणि पिकांसह शेतकऱ्यांचा जीवही भांड्यात पडला. आता चार दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने पिकांची वाढही चांगली आहे. आंतरमशागतीची कामेदेखील वेगाने होत आहेत.

चौकट

भूईमुगाची १०० टक्के पेरणी

जिल्ह्यात भाताची ८४ टक्के, भूईमुगाची १०० तर सोयाबीनची ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून आडसाली उसाची लागणही ३ टक्केवर झाली आहे.

चौकट

जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार १५५ हेक्टर हे खरिपाचे एकूण क्षेत्र त्यापैकी आजअखेर ३ ४१ हजार ६९२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडीत सरासरी क्षेत्रापेक्षाही जास्त क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पीक पेरणीची टक्केवारी

पीक क्षेत्र टक्केवारी

भात ७८८९९ ८४.१७

ज्वारी १४४४ ६१.९६

नागली ७७५८ ४१.३०

तूर ८६० ७९.४८

मूग ९७० ८१.३१

उडीद ८७२ ८२.५०

भूईमूग ३९४८२ १००

सोयाबीन ४०४७८ ९७.४५

तालुकानिहाय पीक पेरणी

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र

हातकणंगले ४४८३० ४८६५६

शिरोळ २८०१९ २९६५१

पन्हाळा २८६६८ २८७५२

शाहूवाडी २०२६१ २१९९५

राधानगरी २८९५० २१५७१

गगनबावडा ६५९८ ५७५२

करवीर ४०३०१ ३८८५१

कागल ४२२७० ४०२७०

गडहिंग्लज ३९०८५ ३८६७२

भूदरगड २६३०८ २३४२६

आजरा २१९८४ १६२६४

चंदगड ३५४२१ २७९२३

एकूण ३६३१५५ ३४१६९२

Web Title: 94% sowing completed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.