96 तास रणजित चिले पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:08 PM2019-08-14T21:08:47+5:302019-08-14T21:09:55+5:30
शेवटी पथकातील जवानांना पायाला जखमा झाल्या. तीन लोकांना नंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व लोक सुरक्षितस्थळी पोहोचल्यावरच त्यांची मोहीम थांबली.
Next
ठळक मुद्देमहापुरात धावून आलेले ‘देवदूत’
महानगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख रणजित चिले आणि त्यांचे ३0 जवान सलग चार दिवस महापुराच्या पाण्यात राहून पूरग्रस्तांच्या बचावाकरिता काम करत होते. सोमवारी सायंकाळपासून चिले यांनी तीन पथकांतील ३0 जवानांना सोबत घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. गुरुवारपर्यंत दोन हजार लोकांना तराफे, बोटीतून बाहेर काढले. उपलब्ध साधनांच्या सहायाने ही मोहीम अखंड सुरू राहिली. शेवटी पथकातील जवानांना पायाला जखमा झाल्या. तीन लोकांना नंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व लोक सुरक्षितस्थळी पोहोचल्यावरच त्यांची मोहीम थांबली.