मागील निवडणुकीपेक्षा ९९ अर्ज जादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:00+5:302021-04-02T04:25:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी यावेळेला ईर्ष्येने २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले असून, मागील निवडणुकीपेक्षा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी यावेळेला ईर्ष्येने २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले असून, मागील निवडणुकीपेक्षा तब्बल ९९ अर्ज जादा आले आहेत. सर्वाधिक २७५ अर्ज सर्वसाधारण गटातून दाखल झाले असले, तरी ९७ अर्ज दाेन जागा असलेल्या महिला गटात भरल्याने इच्छुकांची मांदीयाळी पाहावयास मिळते.
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत १८ जागा होत्या, या निवडणुकीत तीन जागा वाढून संचालक मंडळाची संख्या २१ वर गेली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जरी वाढली असली, तरी विरोधी आघाडीने चांगली मोट बांधल्याचा परिणाम म्हणूनही त्यांच्याकडे इच्छुक अधिक दिसत आहेत. मागील निवडणुकीत ३८३ अर्ज दाखल झाले होते.
३९१ अर्ज घरातच राहिले
‘गोकुळ’साठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तब्बल ८७३ अर्जांची विक्री झाली. त्यातील ४८२ अर्जच दाखल झाले असून, तब्बल ३९१ अर्ज इच्छुकांच्या घरीच राहिले आहेत.
सात माजी संचालकांनी अर्ज भरले.
‘गोकुळ’चे माजी संचालक दिलीप पाटील, फिरोजखान पाटील, अरुंधती घाटगे, अरुण इंगवले, धनाजीराव देसाई, दौलतराव जाधव, दिनकर कांबळे यांनी अर्ज दाखल केले.
मागील निवडणुकीच्या तुलनेत दाखल अर्ज असे, कंसात जागा-
निवडणूक सर्वसाधारण गट महिला राखीव इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती भटक्या विमुक्त जाती
२०१५ २५४ ५८ ४७ १४ १०
२०२१ २७५ ९७ ६८ २० १९