खेळता खेळता खड्ड्यात पडला, अन् दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बडून मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:32 AM2023-06-22T11:32:37+5:302023-06-22T11:39:01+5:30

बाळ कुठेच दिसत नासल्याचे आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता खड्ड्यातील पाण्यात पडलेले बाळ त्यांना आढळून आले

A baby died after falling into a pit in Talandge village of Kolhapur | खेळता खेळता खड्ड्यात पडला, अन् दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बडून मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

खेळता खेळता खड्ड्यात पडला, अन् दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बडून मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

googlenewsNext

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सुदान फार्मा कंपनीमध्ये बांधकामासाठी लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. विराज अमोल मालवाणे (वय दीड वर्षे), असे त्याचे नाव असून या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सुदान फार्मा या कंपनीची तळंदगे गावानजीक उभारणी करण्यात येत आहे. या कंपनीमध्ये अमोल अशोक मालवाणे (रा. यळगूड) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून वास्तव्यासही ते कंपनी आवारातच आहेत. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विराज हे बाळ खेळत खेळत घराबाहेर आले व घरानजीक पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडले. 

बाळ कुठेच दिसत नासल्याचे आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता खड्ड्यातील पाण्यात पडलेले बाळ त्यांना आढळून आले. त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून पुढील तपासासाठी ही घटना गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

Web Title: A baby died after falling into a pit in Talandge village of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.