दुर्दैवी घटना! अवघ्या नऊ महिन्यांचे बाळ पिठाच्या बुट्टीत पडलं, अन् घरच्यांच्या डोळ्या देखत गुदमरून मृत पावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:02 PM2023-02-04T14:02:43+5:302023-02-04T14:21:45+5:30

अन्ननलिकेत पीठ गेल्याने बाळ गुदमरले.

A baby died of suffocation after falling into a bowl of flour, an incident in Kolhapur | दुर्दैवी घटना! अवघ्या नऊ महिन्यांचे बाळ पिठाच्या बुट्टीत पडलं, अन् घरच्यांच्या डोळ्या देखत गुदमरून मृत पावलं

दुर्दैवी घटना! अवघ्या नऊ महिन्यांचे बाळ पिठाच्या बुट्टीत पडलं, अन् घरच्यांच्या डोळ्या देखत गुदमरून मृत पावलं

googlenewsNext

कोल्हापूर : कोणाचा मृत्यू कसा येईल याचा नेम नाही. करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली असून ती हृदयद्रावक आहे. वॉकरवर बसलेले अवघ्या नऊ महिन्यांचे बाळ वॉकरसह पिठाच्या बुट्टीत पडून गुदमरल्याने मृत्यूमुखी पडले. घरातील मोठ्या माणसांसमोर ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कृष्णराज राजाराम यमगर (९ महिने) याला घरच्यांनी वॉकरवर बसविले होते. अचानक वाॅकरसह बाळ गव्हाच्या पिठाच्या बुट्टीत पडले. बुट्टीत पडल्यामुळे बाळाच्या नाका-तोंडात पीठ गेले आणि गुदमरले.

नातेवाईकांनी तोडाला लागलेले पीठ पटकन पुसले, परंतु त्याच्या नाकात, अन्ननलिकेत पीठ गेल्याने बाळ गुदमरले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

Web Title: A baby died of suffocation after falling into a bowl of flour, an incident in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.