पोलिस असल्याची बतावणी करून दुचाकी पळविली, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:23 PM2024-11-29T12:23:01+5:302024-11-29T12:23:19+5:30
कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून दुचाकी पळविल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी समर्थ संजय गोडवे (वय ३१, रा. म्हाडा ...
कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून दुचाकी पळविल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी समर्थ संजय गोडवे (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, एस.एस.सी. बोर्डजवळ, कोल्हापूर यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे.
त्यांनी सांगितल्यानुसार नीलेश सुरेश चव्हाण (३२, रा. वडगाव हवेली, जि. सातारा यांनी ही दुचाकी पळविली आहे. समर्थ हे सोमवारी सांगलीला गेले असता संशयित आरोप नीलेश याने त्यांच्याकडे लिफ्ट मागून ओळख करून घेतली. आपण सांगली एस. पी. कार्यालयात एटीएस शाखेत सहायक पोलिस निरीक्षक पदावर असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर या दोघांमध्ये फोनवरून बोलणे होत राहिले. बिंदू चौकातील जेलमध्ये आरोपी सोडायला आलो आहे असे सांगून नीलेश याने समर्थ याला सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास सायबर चौकात बोलावून घेतले.
यावेळी एक तासासाठी दुचाकी हवी आहे असे सांगून त्याने स्प्लेंडर दुचाकी (एम.एच. १३ क्यु ११४४) घेऊन गेला. तासभरासाठी गाडी नेऊनही लवकर नीलेश लवकर परत न आल्याने समर्थने त्याला फोन लावला. परंतु त्याने एकदाही फोन उचलला नाही. नंतर फोनही लागेना. तेव्हा मात्र दोन, तीन दिवस चौकशी करून समर्थने गुरुवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.