Kolhapur: बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय केले रिकामे, शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:45 PM2024-08-22T12:45:30+5:302024-08-22T12:47:07+5:30

सुहास जाधव पेठ वडगाव : येथील लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटापुर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर ...

A call about a bomb being planted at Yadav College at Peth Vadgaon in Kolhapur Police rushed to the spot and evacuated the college | Kolhapur: बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय केले रिकामे, शोध सुरू 

Kolhapur: बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय केले रिकामे, शोध सुरू 

सुहास जाधव

पेठ वडगाव : येथील लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटापुर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत महाविद्यालय रिकामे केले. तसेच परिसरात नाका बंदी केली. घटनास्थळी एटीएस व बॉम्ब शोधक पथक कॉलेज परिसरात शोध घेतला. मात्र अखेर ही अफवा असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वडगाव लाटवडे रस्त्यावर विजयसिंह यादव महाविद्यालय व बळवंतराव यादव ज्युनियर कॉलेज यांचे संयुक्तिक इमारत आहे. यामध्ये डायल 112 ला सकाळी दहा वाजता अमन मकानदार यांनी चार्ज घेतला. आणि अवघ्या तीन मिनिटात यादव काॅलेज मध्ये कोणी तरी बाॅम्ब ठेवला आहे असे फोन वरून सांगितले अन् फोन कट केला.

या घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस यंत्रणा अ‍ॅक्शन मोड वर येत अवघ्या तीन ते चार मिनिटात कॉलेजमध्ये आले. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडून देण्यास सांगितले. दरम्यान घटनास्थळी वडगाव पालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. अवघ्या तासाभरात एटीएस व बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरु केले. अखेर ही अफवा असल्याचे समोर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच परिसरात चर्चा सुरु झाल्या. आमदार राजू आवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. संस्थेचे कार्यवाह अभिजीत गायकवाड घटनास्थळी होते.

Web Title: A call about a bomb being planted at Yadav College at Peth Vadgaon in Kolhapur Police rushed to the spot and evacuated the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.