भविष्य सांगते म्हणून भोंदूगिरी करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश, कोल्हापुरातील घटना; 'अंनिस'कडून स्टिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:09 AM2022-02-04T11:09:29+5:302022-02-04T11:15:15+5:30

दीड हजार रुपये प्रवेश शुल्क व उपचार करण्यासाठी २५ हजार तसेच गुण आल्यास आणखी २५ हजार रुपये असा दर

A case has been registered against a woman for committing hooliganism in kolhapur | भविष्य सांगते म्हणून भोंदूगिरी करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश, कोल्हापुरातील घटना; 'अंनिस'कडून स्टिंग ऑपरेशन

भविष्य सांगते म्हणून भोंदूगिरी करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश, कोल्हापुरातील घटना; 'अंनिस'कडून स्टिंग ऑपरेशन

googlenewsNext

कोल्हापूर : चेहऱ्याकडे पाहून तुमचे भविष्य सांगते, तुमच्या अडचणी दूर करते, असे सांगून दीड हजार रुपये प्रवेश शुल्क व उपचार करण्यासाठी २५ हजार तसेच गुण आल्यास आणखी २५ हजार रुपये असा दर सांगणाऱ्या एका भोंदू महिलेचा पर्दाफाश गुरुवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे केला.

त्यांना शाहूपुरी पोलिसांची मदत झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही या कारवाईस बळ दिले. सृष्टी राजेश मोरे (वय ४०, रा. प्लॉट नंबर ९३४/११ शाहूपुरी कुंभार गल्ली) असे महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी सांगितले, येथील शाहूपुरी कुंभार गल्लीत ही महिला आपण ज्योतिषशास्त्रात पारंगत असल्याचे सांगून लोकांना विविध आमिषे दाखवत होती. अतिंद्रिय शक्ती भूतबाधा यांच्यासाठी उपाययोजना करून देणे. त्यासाठी होम-हवन करून देते, असे दावे तिने केले होते. त्याबद्दलची तक्रार ‘अंनिस’कडे आली होती.

त्याची दखल घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर त्यांच्याकडे गेल्या. पीडित बाई म्हणून सीमा पाटील यांना नेले. त्यांनी आपले नातेवाईक म्हणून महिला पोलीस व पुरुषांस सोबत नेले. त्यावेळी महिलेचा चेहरा बघून डोळ्यात बघून मनातले ओळखणे, फोन नंबरवरून भविष्य सांगणे, बसलेल्या जागेवर तुमच्या घरी काय आहे, काय नाही, तुमच्या घरातली मानसिक स्थिती कशी आहे? आर्थिक स्थिती कशी आहे? कोणत्या घरात जास्त पसारा आहे वगैरे सांगत असताना संशयित सृष्टी मोरेला पकडून दिले.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिच्यावर महाराष्ट्र नगबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा नोंदवला.

गारा, लिंबू, कवड्या केल्या जप्त

तिच्या घरी अंगारा, धुपारा, अंगावरून उतरून टाकण्याच्या वस्तू, नारळ, लिंबू, लिंबूला खोचलेल्या लवंगा, त्याचबरोबर एका पुडीमध्ये उडीद कापूर व झाडांच्या मुळ्या तसेच कवड्या, जोतिषशास्त्राचे पुस्तक, असे साहित्य जप्त केले.

जिल्हा प्रशासनाची मदत...

या प्रकरणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे या कामाला उभारी मिळाली. त्यांनी लोकांना जागृत करण्यासाठी कामाला लागा, असे सांगितले. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही मोलाची मदत केल्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सीमा पाटील यांनी सांगितले.

Web Title: A case has been registered against a woman for committing hooliganism in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.