Kolhapur: मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी इचलकरंजीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:54 IST2024-05-08T13:53:18+5:302024-05-08T13:54:22+5:30
इचलकरंजी : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन करत आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले. यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण ...

Kolhapur: मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी इचलकरंजीत गुन्हा दाखल
इचलकरंजी : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन करत आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले. यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण करून ते इन्स्टाग्रामवर प्रसारित करत गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असताना एका अनोळखी व्यक्तीने केंद्र क्र. २५३ मधील मतदान केंद्रावर मोबाइल नेऊन तेथे कोणत्या उमेदवारास मतदान केले, याबाबतचा व्हिडीओ चित्रीकरण करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला. हा गोपनीयतेचा भंग आहे. त्यामुळे विशेष लेखापरीक्षक दादासाहेब देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भादंवि कलम १८८ व लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१चे कलम २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.