पोलीस चालक भरतीतील बनावट कागदपत्र प्रकरणी कसबा तारळ्यातील दोघांवर गुन्हा दाखल 

By विश्वास पाटील | Published: September 11, 2024 08:21 AM2024-09-11T08:21:46+5:302024-09-11T08:22:03+5:30

कागदपत्रात फेरफार करणाऱ्या एकास अटक. 

A case has been registered against two people from Kasba Tarla in connection with fake documents in police driver recruitment  | पोलीस चालक भरतीतील बनावट कागदपत्र प्रकरणी कसबा तारळ्यातील दोघांवर गुन्हा दाखल 

पोलीस चालक भरतीतील बनावट कागदपत्र प्रकरणी कसबा तारळ्यातील दोघांवर गुन्हा दाखल 

विश्वास पाटील, कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा पोलीस चालक भरतीमध्ये बनावट कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी कसबा तारळे (ता.राधानगरी) च्या स्वरुप गुरव व विशाल कांबळे या दोघांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या कागदपत्रात फेरफार करणाऱ्या विशाल काबळे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्याद पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी संतोष मारुती पानकर यानी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. 

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात १९ ते २७ जून या कालावधीत १५४  पोलीस  शिपाई तर ५९ पोलीस चालक या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.यात पोलीस शिपाई पदासाठी ६ हजार ७७७ तर चालक पदासाठी ४ हजार ६६८ इतके अर्ज आले होते.यात पोलीस चालक शिपाई पदासाठी २४ ते २६ जून तर महीला व माजी सैनिक याची २७ जून रोजी चाचणी झाली होती. या चालक भरती मध्ये कसबा तारळे राधानगरी येथील स्वरुप संतोष गुरव याने इतर मागास प्रवर्गातून अर्ज भरला होता.

भरती प्रक्रियेत मैदानी व लेखी चाचणीत पात्र झाल्यानंतर गुरव याने आपली मुळ शैक्षणिक, समांतर आरक्षणाची कागदपत्रे,जात प्रमाणपत्र, नाॅन क्रीमिलेयर प्रमाणपत्र घेऊन पोलीस दलाच्या वतीने त्याची पडताळणी करण्यात आली यात दाखल केलेली कागदपत्र ही खोटी असलेच व ती खरी म्हणून दाखल केल्याने स्वरुप संतोष गुरव.रा.कसबा तारळे.ता.राधानगरी व ही कागदपत्रे शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुसर्‍याचा आयडी वापरुन इतर व्यक्तीच्या मुळ दाखल्यामध्ये फेरफार करून त्यावर शासनाचे खोटे व बनावट शिक्के तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी विशाल विष्णु काबळे.व.व २८ रा.कसबा तारळे ता.राधानगरी यास शाहुपुरी पोलीसांनी अटक केली असून त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.या भरती प्रक्रियेसाठी प्रथमच अचूक वेळ मोजण्यासाठी व डमी उमेदवार होऊ नये म्हणून अधुनिक पद्धतीचे आयएफआयडी व फेस रिकग्नायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. 

Web Title: A case has been registered against two people from Kasba Tarla in connection with fake documents in police driver recruitment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.