कोल्हापुरातील रिल्स स्टार युगुलाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

By उद्धव गोडसे | Published: June 25, 2024 07:00 PM2024-06-25T19:00:32+5:302024-06-25T19:01:18+5:30

रिल्स स्टार युगुलाचे सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्यामुळे व्हायरल व्हिडिओने खळबळ

A crime has been booked against the young man who made the pornographic video of Reels star couple go viral in Kolhapur | कोल्हापुरातील रिल्स स्टार युगुलाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

कोल्हापुरातील रिल्स स्टार युगुलाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : रिल्स स्टार युगुलाच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ कॉपी करून ते सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी उमेश सुरेश भास्कर (वय ३२, रा. कुडित्रे, ता. करवीर) याच्यावर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित तरुणीने मंगळवारी (दि. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील रिल्स स्टार तरुण आणि उपनगरातील एका तरुणीचे प्रेम संबंध होते. तरुणाच्या मोबाइलमध्ये दोघांचे काही अश्लील व्हिडिओ होते. तरुणाने तो मोबाइल फेब्रुवारी २०२४ मध्ये उमेश भास्कर याला विकला. त्यावेळी उमेश याने मोबाइलमधील डेटा ट्रान्सफर करताना काही व्हिडिओ कॉपी करून घेतले. त्यातील काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. 

हा प्रकार लक्षात येताच रिल्स स्टार युगुलाचे धाबे दणाणले. शहर उपअधीक्षक अजित टिके यांनी व्हायरल व्हिडिओबद्दल संबंधित तरुणाला बोलवून घेऊन चौकशी केली. मोबाइल विकत घेणारा उमेश भास्कर याने व्हिडिओ व्हायरल केल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. त्यानुसार पोलिसांनी भास्कर याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे. रिल्स स्टार युगुलाचे सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्यामुळे व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली होती.

Web Title: A crime has been booked against the young man who made the pornographic video of Reels star couple go viral in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.