कोल्हापूर: भोगावती नदीवरील कोगे येथील पुलावर मृत गवा अडकला, बघ्यांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 04:01 PM2022-07-13T16:01:15+5:302022-07-13T16:02:32+5:30

पाणी पिण्यासाठी गवा नदीपात्रात गेला असता वाहून आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

A dead Gaur got stuck on the bridge at Koge on Bhogawati river kolhapur district | कोल्हापूर: भोगावती नदीवरील कोगे येथील पुलावर मृत गवा अडकला, बघ्यांची मोठी गर्दी

कोल्हापूर: भोगावती नदीवरील कोगे येथील पुलावर मृत गवा अडकला, बघ्यांची मोठी गर्दी

Next

प्रकाश पाटील

कोपार्डे : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्या दुभडी भरुन वाहू लागल्या आहेत. पाण्याबरोबर वाहत अनेक झाडे, वस्तू नदीवरील बंधाऱ्यांना अडकत आहेत. या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूर्ण वाढ झालेल्या गव्याचा मृतदेह भोगावती नदीवरील कोगे येथे नवीन बांधण्यात आलेल्या पुलाला अडकला. मृत गव्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पुलाच्या कोगे गावच्या बाजूला हा गवा मृत आढळून आला. पुलावर पाणी आल्याने पुराचे पाणी पहायला आलेल्या लोकांच्या तो निदर्शनास आला. हा मृत गवा राधानगरी जंगलातील आहे का, भोगावती खोऱ्यामधील डोंगर कपाऱ्यातील कळपातील आहे याबाबत अंदाज येत नाही. पाणी पिण्यासाठी गवा नदीपात्रात गेला असता वाहून आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सतंतधार व मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी  पात्राबाहेर पडल्याने नदी काठच्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पूरस्थिती गंभीर होण्याआधाच प्रशासन सतर्क झाले आहे. वेळोवेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देत काही नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: A dead Gaur got stuck on the bridge at Koge on Bhogawati river kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.