मद्यधुंद ट्रकचालकाची सहा दुचाकींना धडक, नागरिकांनी पाठलाग करत दिला चोप; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:40 AM2023-02-13T11:40:04+5:302023-02-13T11:42:04+5:30

टायर फुटला, ट्रक व्हीलवर पळवला

A drunk truck driver hit six bikes in Kolhapur | मद्यधुंद ट्रकचालकाची सहा दुचाकींना धडक, नागरिकांनी पाठलाग करत दिला चोप; कोल्हापुरातील घटना

मद्यधुंद ट्रकचालकाची सहा दुचाकींना धडक, नागरिकांनी पाठलाग करत दिला चोप; कोल्हापुरातील घटना

googlenewsNext

कोल्हापूर : मद्यधुंद ट्रकचालकाने बेदरकारपणे ट्रक चालवत रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फुलेवाडी परिसरातील पाच ते सहा दुचाकींना धडक दिली. नागरिकांनी पाठलाग करून या ट्रकचालकास बेदम चोप देत ट्रकची तोडफोड केली. त्यात ट्रकचालक शीतल काशीनाथ शिपुगडे (वय ३२, रा. बापट कॅम्प) हा जखमी झाला आहे.

राजापूर येथून चिरा भरून ट्रकचालक शीतल शिपुगडे कोल्हापूरच्या दिशेने येत होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याने कळे येथील एका धाब्यावर मद्यप्राशन आणि जेवण केले. तशा अवस्थेतच कोल्हापूरकडे चाललेल्या या ट्रकचालकाने वाटेत रस्त्याकडेला थांबलेल्या काही दुचाकींना धडक दिली.

टायर फुटला, व्हीलवर पळवला ट्रक

वाटेत त्याच्या ट्रकचा एका बाजूचा टायरही फुटला; पण त्याने ट्रक न थांबवता केवळ व्हीलवर कोल्हापूरकडे पलायन केले. नंतर फुलेवाडीजवळही त्याने काही दुचाकींना धडक दिली. वाटेत त्याने अनेकांच्या अंगावर वाहन घातले; पण अनेकांनी त्याला चुकविल्याने त्यांचा जीव बचावला.

पाठलाग करत फुलेवाडीजवळ दिला चोप, ट्रकची तोडफोड

दरम्यान, कळे येथील काही दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करत फुलेवाडीपर्यंत आले. त्यांनी चालकाला वाटेतच अडवून थांबविले. ट्रकमधून उतरल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील चालकाला जमलेल्या नागरिकांनी मारहाण करत ट्रकची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालक शीतलला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: A drunk truck driver hit six bikes in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.