Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 12:40 PM2023-03-04T12:40:29+5:302023-03-04T12:41:06+5:30

दोषींवर कठोर कारवाई करा

A farmer was killed by lightning while plowing the field in Chandgad Kolhapur district | Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार 

Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार 

googlenewsNext

चंदगड : शेतात नांगरट करताना शाॅक लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुक्कीहाळ (ता. चदगड) येथे शुक्रवारी दुपारी घडली. संतोष सुरेश बच्चेनट्टी (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांनी येऊन घटनेचा पंचनामा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे म्हणत कार्यकारी अभियंत्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी अडवून धरल्यामुळे रात्री उशिरापर्यंत गावात वातावरण तणावग्रस्त बनले होते.

शुक्रवारी सकाळी संतोष बैलजोडी घेऊन शेतात नांगरणी करण्यासाठी गेला होता. नांगरणी सुरू असताना नांगराचा फाळ खांबाच्या ओढणीला लागला असता त्यामधील विजेचा शॉक त्याला लागला. हा धक्का इतका तीव्र होता की, दुर्दैवी संतोष बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मतदेह चंदगडला पाठविला. 

ही माहिती समजताच गावात तणावपूर्ण वातावरण बनले. त्यामुळे ग्रामस्थांची समजूत काढायला गेलेल्या कार्यकारी अभियंता विशाल लोदींसह कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांनी येऊन पंचनामा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेऊन त्यांना अडवून धरले. त्यानंतर पैलवान विष्णू जोशिलकर, नरसिंग बाचूळकर, जनार्दन देसाई यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही.

त्यानंतर रात्री उशिरा इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर युवराज वाघ व त्यांच्या पथकाने पंचनामा केल्यामुळे वातावरण निवळले. रात्री उशिरा संतोषवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा

घटनेची माहिती आमदार राजेश पाटील व शिवसेनेचे राजू रेडेकर यांना समजताच घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना कार्यकारी अभियंता विशाल लोदी यांना दिल्यावर वातावरण थोडे निवळले.

Web Title: A farmer was killed by lightning while plowing the field in Chandgad Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.