कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिकांमधून संताप
By सचिन भोसले | Published: October 25, 2023 06:16 PM2023-10-25T18:16:01+5:302023-10-25T18:16:24+5:30
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी शहर व परिसरातून चार ...
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी शहर व परिसरातून चार लाख रूपये किंमतीच्या सात दुचाकींची चोरी झाली आहे. संबधित पोलिस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात पावणे दोन लाख किंमतीच्या दुचाकीचाही समावेश आहे. वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
चोरीच्या घटनेत वरणगे पाडळीतील सचिन बुचडे (वय २५) यांची घराजावळ उभी केलेली ३० हजार किंमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.२३) रात्री घडली. बुचडे यांनी करवीर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटने गिरगाव (ता. करवीर) तील विनायक श्रीकांत जाधव (वय १९) या युवकाची २५ हजार किंमतीची दुचाकी चोरीस गेली. हीही घटना सोमवारी (दि.२३) घडली. याबाबतची फिर्याद त्याने इस्पुर्ली पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. इचलकरंजी दत्तनगरातील विनोद मधुकर गांजवे (वय ३८) यांची घराजवळ उभी केलेली ४० हजार किंमतीची दुचाकी चोरीस गेली. याबाबतची फिर्याद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.
औरबाड(ता.शिरोळ) तील इरफान शिराजुद्दीन करीमखान (वय ५४) यांची १ लाख ७० हजार किंमतीची दुचाकी मंगळवारी (दि.२४) चोरीस गेली. याबाबतची फिर्याद त्यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात नोंदविली. वडगावातील जैन बस्ती जवळ उभी केलेली २५ हजारांची दुचाकी चोरीस गेली. याबाबतची फिर्याद शिवाजी केशव मस्के (वय ४९, रा. रामनगर, आष्टा, ता. वाळवा) यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. यासह शहरातील शाहूपुरी परिसरातून २५ हजार किंमतीची मोपेड चोरीस गेली आहे. याबाबतची फिर्याद भूमी संजय जाधव ( १९, रा. नाना पाटीलनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी (दि.२०) गुजरी परिसरात उभी केलेली दुचाकी चोरीस गेली आहे. याबाबतची फिर्याद सुनील शिवाजी शिंदे (वय रा. २६, म्हारूळ, ता.करवीर ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या दुचाकी चोरीस गेल्यामुळे वाहनधारकांतून भितीचे वातावरण आहे. पोलिसांनीही तत्परतेने या दुचाकी चोरट्यांच्या माग काढून अटक करावी. अशी मागणी होत आहे.