Kolhapur: चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे सापडला बाराफुटी 'किंग कोब्रा' video
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 02:19 PM2024-09-23T14:19:44+5:302024-09-23T14:21:37+5:30
चंदगड : कळसगादे येथे बाराफुटी किंग कोब्रा साप आढळल्याची घटना रविवारी घडली. यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाची भंबेरी उडाली होती. तो ...
चंदगड : कळसगादे येथे बाराफुटी किंग कोब्रा साप आढळल्याची घटना रविवारी घडली. यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाची भंबेरी उडाली होती. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र वनविभागाने त्याला सिताफीने पकडून कोणतीही इजा न करता जंगलात सोडले.
रविवारी कळसगादे येथे किंग कोब्रा असल्याची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक रामानुंज व उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी पाहणी केल्यानंतर आर आर टी व पार्ले येथील हत्ती हकारा गटाच्या मदतीने त्याला पकडून कोणतीही इजा न करता परत जंगलात सोडले. यावेळी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप सुतार, वनपाल जी. आर. डिसूझा, बी. आर. भांडकोळी, एस. जे. नागवेकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, के. जी. कातखडे यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Kolhapur: चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे सापडला किंग कोब्रा. #kolhapurpic.twitter.com/dEcTvR2JPW
— Lokmat (@lokmat) September 23, 2024